शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

हनी बाबू यांच्या जामीन अर्जावर प्रतिज्ञापत्र सादर करा, ‘एनआयए’ला न्यायालयाकडून अखेरची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 14:17 IST

एनआयएने ८ जूनला दुसऱ्या एका खंडपीठाला हनी बाबू यांच्या जामीन अर्जावर दोन आठवड्यांत उत्तर दाखल करू, असे आश्वासन दिले होते.

मुंबई : एल्गार परिषद - माओवादी संबंधप्रकरणी आरोपी असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक हनी बाबू यांच्या जामीन  अर्जावर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. १) एनआयएला अखेरची संधी दिली. न्या. एन. एम. जामदार व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने ८ जुलैपर्यंत एनआयएला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले.एनआयएने ८ जूनला दुसऱ्या एका खंडपीठाला हनी बाबू यांच्या जामीन अर्जावर दोन आठवड्यांत उत्तर दाखल करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, शुक्रवारच्या सुनावणीत एनआयएचे वकील संदेश पाटील यांनी न्यायालयाला सांगितले की, प्रतिज्ञापत्र तयार असून, दिल्लीला अंतिम मंजुरीसाठी पाठविले आहे. प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आणखी एका आठवड्याची मुदत वाढवून द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली.त्यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आणखी एक आठवड्याची मुदत वाढवून देतो, मात्र ही अखेरची संधी असेल, असे न्यायालयाने म्हटले. माझ्याविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे विशेष न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण चुकीचे आहे, असे बाबू यांनी याचिकेत म्हटले आहे. 

जामीन अर्जात काय म्हटले ?-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट करण्यासंदर्भात एका पत्रात नमूद आहे. ते पत्र एनआयएने पुरावा म्हणून जोडले आहे, मात्र हे पत्र आपले नाही. -  देशविरोधी कृत्य करण्याचा आपला हेतू असल्याचा किंवा अशा कृत्याचे मी समर्थन करत असल्याचे सुचविणारे साधे पुरावेही एनआयएकडे नाहीत, असे बाबू यांनी जामीन अर्जात म्हटले आहे.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCourtन्यायालय