शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

डीएसकेंकडून १२ कोटींच्या मालमत्ता लिलावाची कागदपत्रे सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 2:57 AM

पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याकडून १२ कोटी रुपयांच्या लिलावाच्या मालमत्तेची कागदपत्रे मंगळवारी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. ही मालमत्ता ताब्यात घेऊन तातडीने गरजू गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

मुंबई : पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याकडून १२ कोटी रुपयांच्या लिलावाच्या मालमत्तेची कागदपत्रे मंगळवारी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. ही मालमत्ता ताब्यात घेऊन तातडीने गरजू गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.गेल्या सुनावणीत कबूल केल्याप्रमाणे डीएसके गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यास मंगळवारीही अपयशी ठरले. मात्र, डीएसकेंच्या वतीने बुलडाणा बँकेचा प्रस्ताव न्या. साधना जाधव यांच्यापुढे ठेवण्यात आला. बुलडाणा बँकेने डीएसकेंना १०० कोटींचे कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यासाठी डीएसकेंच्या २०० कोटींच्या मालमत्ता त्यांच्याजवळ गहाण ठेवाव्या लागतील. सध्यातरी डीएसकेंजवळ असलेल्या १२ कोटींच्या विकण्या योग्य मालमत्ता विकत घेण्याची तयारी बँकेने दाखविली आहे. परंतु बुलडाणा बँकेचा हा दावा प्रभुणे इंटरनॅशनलप्रमाणे फोल ठरू नये, यासाठी न्या. जाधव यांनी बुलडाणा बँकेला डीएसकेंना १०० कोटी रुपये कर्ज देण्याबाबत १७ फेब्रुवारीपर्यंत संचालक मंडळाची बैठक घेऊन, ठराव संमत केल्याचे पत्र तपासयंत्रणेपुढे सादर करण्याचे निर्देश दिले.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर न्या. जाधव यांनी डीएसकेंच्या अटकपूर्व जामिनावरील निर्णय २२ फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवला.डीएसकेंकडे किती रुपयांचे देणे आहे, अशी चौकशी न्यायालयाने सरकारी वकिलांकडे केली असता, त्यांनी १,१५३ कोटी द्यायचे असल्याचे सांगितले. मात्र, डीएसकेंच्या वकिलांनी २३२ कोटी द्यायचे आहेत, अशी माहिती दिली....हे जास्त अपमानकारक नाही का?काही गुंतवणूकदारांनी आपल्या व्यथा मांडण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर डीएसकेंना गुंतवणूकदारांच्या समधानासाठी न्यायालयात हजर केल्याचे न्या. जाधव यांनी म्हटले. ‘तुमच्या व्यथा समजण्यासाठीच त्यांना हजर राहायला सांगितले. पोलीस ठाण्यात पाठविण्यापेक्षा न्यायालयात हजर राहायला सांगणे, हे जास्त अपमानकारक नाही का?’ असा सवाल न्यायालयाने केला.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी