सुबोध भावे की नाना पाटेकर? कोण मारेल बाजी.. तुम्ही निवडा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर
By Admin | Updated: March 23, 2016 10:51 IST2016-03-23T10:50:52+5:302016-03-23T10:51:10+5:30
या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी लोकमतने सुरू केलेल्या पुरस्काराची परंपरा सिद्ध होऊ पाहात आहे.

सुबोध भावे की नाना पाटेकर? कोण मारेल बाजी.. तुम्ही निवडा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर
मुंबई, दि. २३ - या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी लोकमतने सुरू केलेल्या पुरस्काराची परंपरा (इथे क्लिक करुन तुम्ही तुमचे मत नोंदवा) आता सिद्ध होऊ पाहात आहे.
यंदाच्या तिसऱ्या पर्वातही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीयनांना प्रगतीपथावर नेणाऱ्यांमधून लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर चे मानकरी ठरविण्याची प्रक्रिया लोकमतच्या संपादकीय चमूने केलेले मंथन, राज्यभरातील कोटय़वधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून साकारत आहे. या प्राथमिक निवडीतून अंतिम विजेते निवडण्याचा मान आहे तुमचा!
तर आपलं बहुमूल्य मत बनवण्यासाठी करा इथे क्लिक.