सुभाष भामरेंनी विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणीकडे
By Admin | Updated: July 21, 2016 20:00 IST2016-07-21T20:00:57+5:302016-07-21T20:00:57+5:30
केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली खा. कपिल पाटील, आमदार आसिफ शेख यांनी राज्यातील यंत्रमाग उद्योगावर आलेल्या मंदीमुळे विणकरांच्या

सुभाष भामरेंनी विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणीकडे
मालेगाव (नाशिक)-केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली खा. कपिल पाटील, आमदार आसिफ शेख यांनी राज्यातील यंत्रमाग उद्योगावर आलेल्या मंदीमुळे विणकरांच्या विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन देण्यात आले.
केंद्र सरकारच्या जाचक निर्यात धोरण, दुष्काळामुळे कपाशीच्या उत्पन्नात घट झाली. यामुळे सुताच्या भावात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. या तुलनेत तयार कापडाचे भाव गडगडल्याने यंत्रमाग उद्योगावर मंदी आहे. यामुळे संकटात सापडलेल्या उद्योगास बाहेर काढून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात भाजपचे शहराध्यक्ष सुनील गायकवाड, मुकेश झुनझुनवाला, शोएब गुड्डू, साजीद अन्सारी यांचा समावेश होता.