शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘चाऱ्या’तून बाहेर पडण्यापूर्वीच पाय ‘वाळू’त रुतले; उपविभागीय अधिकारी राशीनकरांच्या अडचणी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 08:32 IST

२०१९च्या दुष्काळात भूम व परंडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात चारा छावण्या सुरू झाल्या होत्या. या छावण्यातील बोगसगिरी तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी लेखी अहवालाद्वारे उघड केली होती.

चेतन धनुरे उस्मानाबाद : वाळूच्या चक्रात अडकून लाचलुचपतच्या जाळ्यात फसलेल्या उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. चुकीच्या पद्धतीने चारा छावण्यांचा तब्बल साडेपाच कोटी रुपयांचा दंड कमी केल्याच्या प्रकरणात चौकशीचा ससेमिरा पाठीशी असताना केलेले हे नवीन धाडस त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे.

२०१९च्या दुष्काळात भूम व परंडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात चारा छावण्या सुरू झाल्या होत्या. या छावण्यातील बोगसगिरी तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी लेखी अहवालाद्वारे उघड केली होती. त्याआधारे छावणी चालकांना सुमारे आठ कोटींहून अधिक दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, चुकीच्या पद्धतीने राशीनकर यांनी यातील ९१ प्रकरणांमध्ये सुमारे साडेपाच कोटींचा दंड कमी केल्याचा ठपका अंतर्गत लेखापरीक्षण समितीने ठेवलेला आहे. त्याची जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर पुन्हा चौकशी झाली. गेल्या वर्षभरात चारवेळा राशीनकर यांच्यावरील कारवाईचे प्रस्ताव शासनाकडे गेले आहेत.  

काय आहे चौकशीतील ठपका? चारा छावण्या सुरू असताना अधिकाऱ्यांनी भेट देऊन चारा वाटप होत नाही, पशुधन संख्येत तफावत, रेकॉर्ड न ठेवणे, शेड नसणे, बंधनकारक असतानाही सीसीटीव्ही नसणे, अशा अनेक त्रुटींचे अहवाल दिले होते. मात्र, तहसीलदारांच्या अहवालाकडे कानाडोळा करून राशीनकर यांनी दंड कमी केला. छावणीचालकांच्या खुलाशासोबत पुरावा नसतानाही दंड कमी केला. 

शासनाने मागितला अभिप्राय राशीनकर यांच्यावर चारा प्रकरणात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चौकशीनंतर विभागीय चौकशी यापूर्वीच प्रस्तावित केली आहे. ७ जुलै रोजी शासनाने पुन्हा या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्राय मागविला. यानंतरही चौकशी सुरू ठेवून कठोर कारवाई करावी, असा अभिप्राय जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास दिल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग