शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

उपराजधानीत सायबर गुन्ह्यांचा व्हायरस वाढतोय!

By admin | Updated: January 9, 2017 16:29 IST

सायबर क्राईम किंवा आयटी अ‍ॅक्टअंतर्गत २६८ गुन्हे दाखल झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील ७० टक्के गुन्हे हे गेल्या २ वर्षांतील आहेत.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 9 : गेल्या ५ वर्षांमध्ये उपराजधानीत इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कॅशलेसच्या युगात आता ई-सेवा थेट मोबाईलपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. युवापिढीसाठी तर इंटरनेट दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे. परंतु ई-क्रांतीसोबतच सायबर क्राईमच्या प्रकरणांमध्येदेखील वाढ होत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये नागपुरात सायबर क्राईम किंवा आयटी अ‍ॅक्टअंतर्गत २६८ गुन्हे दाखल झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील ७० टक्के गुन्हे हे गेल्या २ वर्षांतील आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी शहरातील सायबर क्राईमसंदर्भात माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. २०१२ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत सायबर क्राईमचे किती गुन्हे दाखल करण्यात आले, किती आरोपींना अटक करण्यात आली हे प्रश्न त्यांनी विचारले होते. यासंदर्भात मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार जानेवारी २०१२ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत भादंवि, सायबर तसेच आयटी अ‍ॅक्ट मिळून एकूण २६८ गुन्हे दाखल करण्यात आले. २०१५ व २०१६ मध्ये यातील सुमारे ७० टक्के म्हणजेच १८८ गुन्ह्यांची नोंद झाली. दरवर्षी सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.सायबर गुन्ह्यांची वर्षनिहाय आकडेवारीवर्ष गुन्हे२०१२१५ २०१३१९ २०१४४६२०१५ ९८२०१६ (नोव्हेंबरपर्यंत)९० १०३ गुन्हेगारांना अटकमाहितीच्या अधिकाराअंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात ह्यसायबर क्राईमच्या गुन्ह्याअंतर्गत १०३ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. गेल्या २ वर्षात हा आकडा ५० इतका होता.