शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘’पीक विमा योजनेस पर्यायी योजना आणण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती’’, धनंजय मुंडे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 20:55 IST

Maharashtra News: राज्याचे मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्री तसेच कृषिमंत्री म्हणून मी स्वतः पिक विमा कंपन्यांच्या सोबत सातत्याने बैठका घेऊन मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीचा विमा तातडीने वितरण केला जावा, यासाठी वारंवार पाठपुरावा करत असतो. त्यानुसार यावर्षी राज्यात अग्रीम मध्येच विक्रमी पिक विमा वाटप करण्यात आले आहे.

मुंबई  - राज्याचे मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्री तसेच कृषिमंत्री म्हणून मी स्वतः पिक विमा कंपन्यांच्या सोबत सातत्याने बैठका घेऊन मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीचा विमा तातडीने वितरण केला जावा, यासाठी वारंवार पाठपुरावा करत असतो. त्यानुसार यावर्षी राज्यात अग्रीम मध्येच विक्रमी पिक विमा वाटप करण्यात आले आहे. मात्र तरीही विविध पीक विमा कंपन्यांचे विमा नुकसान देण्याबाबतचे धोरण आणि दप्तर दिरंगाई याबाबत शेतकऱ्यांच्या व बऱ्याच लोकप्रतिनिधींच्या नेहमीच तक्रारी येत असतात त्यावरून पिक विमा योजनेवरती आपण सर्व समाधानी आहोत असे नाही, त्यामुळेच शेतकऱ्यांना अधिकचा आधार व अडचणीच्या काळात दिलासा मिळावा, या दृष्टीने पिक विमा योजनेला पर्यायी योजना आणण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यास समितीची नेमणूक करण्यात आलेली असून ही समिती देशातील इतर राज्यांमध्ये राबवली जाणारी पिक विमा योजना तसेच ज्या राज्यांमध्ये पिक विमा योजनाच लागू नाही अशा राज्यांमध्ये शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीने नुकसानी बाबत लाभ दिला जातो याचा परिपूर्ण अभ्यास करून याबाबतचा अहवाल लवकरच शासनास सादर करेल, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत बोलताना दिली.

विधानसभेत आज 293 च्या प्रस्तावा नावे विविध सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावास कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले.  यावेळी सन 2023 च्या खरीप हंगामात पावसाने झालेल्या नुकसानी पोटी अग्रीम 25% प्रमाणे पिक विमा वितरण करण्यात आले. याद्वारे राज्यात विक्रमी 7000 कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला, तर यापैकी 4000 कोटींपेक्षा जास्त विमा रकमेचे वितरण पूर्ण झाले व उर्वरित रक्कमेचे वितरण सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे 2016 पासून आजपर्यंतची विमा वितरणाची ही आकडेवारी रेकॉर्ड ब्रेक असून यामध्ये अंतिम पीक कापणी अहवाला नंतर सरासरीच्या हिशोबाने येणारी पिक विमा रक्कम याची त्यात वाढ होणार असून अंतिम पीक कापणी नंतरचे पीक विम्याचे वितरण सुद्धा जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण केले जाईल, असेही धनंजय मुंडे यांनी सभागृहात सांगितले.

केंद्रीय कृषी मूल्य आयोगाकडे जी पाच राज्य विविध पिकांच्या हमीभावाच्या किमतींची शिफारस करतात, त्यामध्ये महाराष्ट्र देखील एक प्रमुख राज्य असून वेगवेगळ्या राज्यांनी विविध पिकांना सुचवलेल्या किमतींमध्ये असलेल्या तफावतीमुळे बऱ्याचदा हमीभावामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत येते. त्यामुळे हमीभाव सुचवताना सर्व राज्यांची सुसुत्रता व एक वाक्यता असावी असे आपण नुकत्याच केंद्रिय कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीमध्ये प्रस्तावित केले असून याचीही अंमलबजावणी याच वर्षीपासून होणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.   

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDhananjay Mundeधनंजय मुंडेFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा