जळगावात विद्यार्थ्याची आत्महत्या

By Admin | Updated: April 26, 2017 01:34 IST2017-04-26T01:34:01+5:302017-04-26T01:34:01+5:30

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या चाळीसगाव येथील शुभम ज्ञानेश्वर महाजन (२३, रा.चाळीसगाव) या विद्यार्थ्याने जळगावातील

Student's suicide in Jalgaon | जळगावात विद्यार्थ्याची आत्महत्या

जळगावात विद्यार्थ्याची आत्महत्या

जळगाव : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या चाळीसगाव येथील शुभम ज्ञानेश्वर महाजन (२३, रा.चाळीसगाव) या विद्यार्थ्याने जळगावातील शाहू नगरातील दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राच्या गच्चीवर अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतले, त्यानंतर इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरूअसताना सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. शुभम याचे बी.टेक पर्यंत शिक्षण झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Student's suicide in Jalgaon