अकारावीत प्रवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थीनीची आत्महत्या

By Admin | Updated: July 25, 2016 17:54 IST2016-07-25T17:54:38+5:302016-07-25T17:54:38+5:30

दहावीच्या परिक्षेत कमी गुण मिळाले त्यामुळे अकारावीत प्रवेश मिळत नसल्याने शिक्षणापासून वंचित रहावे लागणार या नैराश्येपोटी घाटनांद्रा ता. मेहकर येथील एका विद्यार्थीनीने विहीरीत

Student's suicide due to uncertain admission | अकारावीत प्रवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थीनीची आत्महत्या

अकारावीत प्रवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थीनीची आत्महत्या

ऑनलाइन लोकमत
बुलढिाणा  : दहावीच्या परिक्षेत कमी गुण मिळाले त्यामुळे  अकारावीत प्रवेश मिळत नसल्याने शिक्षणापासून वंचित रहावे लागणार या नैराश्येपोटी घाटनांद्रा ता. मेहकर येथील एका विद्यार्थीनीने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.  कु.जया विजय राठोड असे या विद्यार्थीनीेचे नाव आहे.
 

मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा येथील विजय राठोड यांची मुलगी कु. जया विजय राठोड ही खामगाव येथील न्यु.ईरा हायस्कुलमध्ये शिक्षण घेत होती. यावर्षी ती दहावी पास झाली. मात्र दहावीमध्ये तीला जेमतेम ४५ टक्केच गुण मिळाले. कमी गुण मिळाले तरी तीने पुढील शिक्षण घेण्याची ईच्छा वडिलाजवळ व्यक्त केली.

  मुलगी किमान १२ वी पर्यंत शिकावी अशी वडिलांची सुध्दा ईच्छा होती. म्हणून विजय राठोड यांनी तीला अकरावीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांना अपयश आले. कोणत्याच कॉलेजला प्रवेश मिळत नव्हाता, अनेक महाविद्यालयाचे उबंरठे राठोड यांनी झीजवूनही त्यांना यश मिळाले नाही. काही कॉलेजवर प्रवेश पाहिजे असेल तर डोनेशन लागेल, असे सांगण्यात आले मात्र प्रवेशाससाठी पैसे भरण्याची त्यांची ऐपत नसल्याने आपणाला शिक्षणापासून वंचित रहावे लागणार या नैराश्यापोटी जया हीने २५ जूलैच्या सकाळी घरातील सर्व मंडळी झोपलेली असल्याचे पाहून ती घराशेजारील विहीरीवर गेली, व तीने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली.

. ही बाब सकाळी उघडकीस आली. प्रवेशासाठी डोनेशन भरू शकत नसल्याने जया राठोड हिने आत्महत्या केल्याच्या या घटनेमुळे परिसरात हळ हळव्यक्त होत आहे.

गरीबीमुळे पुन्हा एका सावित्रीचा अंत
एसटी बसची पास काढण्यासाठी वडिलाकडे पैसे नसल्यामुळे मागील वर्षी एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली होती. अशीच काहीशी घाटनांद्रा येथील ही घटना असून मृतक जया राठोड हिचे वडिल अल्पभुधारक आहेत. मागील दोन वर्षापासून नापिकीमुळे शेतीत माल होत नाही. मागील वर्षी पेरणीसाठी काढलेले बँकेचे ५० हजार रूपये कर्ज कायम आहे. अशातच यावर्षी सुध्दा पेरणीसाठी उसनवारी करावी लागली. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे विजय राठोड यांनी मुलीच्या शिक्षणाला पुर्णविराम द्यावा लागला होता. मुलींच्या शिक्षणावर शासन कोट्यावधी रूपये खर्च करते. तरीही गरीबी व दारिद्र्यामुळे अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत. याच गरीबी व दारिद्र्यामुळे आज पुन्हा एका सावित्रीला आपली जीवनयात्रा संपवावी लागली

Web Title: Student's suicide due to uncertain admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.