आवडते कॉलेज न मिळाल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या
By Admin | Updated: June 28, 2017 18:27 IST2017-06-28T18:27:02+5:302017-06-28T18:27:02+5:30
प्रवेश न मिळाल्यामुळे निराश झालेल्या वसमत तालुक्यातील गिरगांव येथील वर्षा व्यंकटराव नादरे (१९) या विद्यार्थीनीने गोदावरीत उडी घेवून आत्महत्या केली.

आवडते कॉलेज न मिळाल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 28 - बारावीचा निकाल नुकताच लागला असून आवडत्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे निराश झालेल्या वसमत तालुक्यातील गिरगांव येथील वर्षा व्यंकटराव नादरे (१९) या विद्यार्थीनीने गोदावरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
वर्षा नादरे हिचे कुटुंबिय हिंगोली जिल्ह्यातील गिरगांव येथे राहते. वर्षा ही भाऊ व बहिणीसोबत शहरातील बाबानगर परिसरात राहत होती. याच भागात असलेल्या यशवंत महाविद्यालयातच तीने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. परंतु बारावीत अपेक्षित टक्केवारी न मिळाल्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून निराश होती.
त्यात पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तीने यशवंत महाविद्यालयात अर्जही केला होता़ परंतु टक्केवारी कमी असल्यामुळे तिला प्रवेश मिळाला नाही. तर तिच्याच सोबत राहत असलेल्या भाऊ आणि बहिणीला मात्र यशवंतमध्ये प्रवेश मिळाला. त्यामुळे ती आणखीच निराश झाली. त्यात मंगळवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ती अचानक घरातून बाहेर पडली. ही बाब भाऊ आणि बहिणीला समजल्यानंतर त्यांनी तिचा शोधही घेतला. परंतु सापडली नाही़ बुधवारी सकाळी गोदावरीच्या पात्रात तिचे प्रेत आढळले. वर्षा हिने गोवर्धन घाट पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची नोंद वजिराबाद पोलिसांनी केली आहे.