मलेशियात अडकलेले विद्यार्थी स्वातंत्र्यदिनी परतणार

By Admin | Updated: July 25, 2014 02:49 IST2014-07-25T02:49:15+5:302014-07-25T02:49:15+5:30

नोकरी देणा:या एजंटाने फसवणूक केल्याने मलेशियात अडकलेल्या 19 भारतीय विद्याथ्र्याचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Students stuck in Malaysia return on Independence Day | मलेशियात अडकलेले विद्यार्थी स्वातंत्र्यदिनी परतणार

मलेशियात अडकलेले विद्यार्थी स्वातंत्र्यदिनी परतणार

अनिकेत घमंडी - ठाणो
नोकरी देणा:या एजंटाने फसवणूक केल्याने मलेशियात अडकलेल्या 19 भारतीय विद्याथ्र्याचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 14 ते 18 ऑगस्टदरम्यान ही सर्व मुले मायदेशी परतणार आहेत. सुमारे 2क्क्क् रिंगिट (4क् हजार रुपये) दंड भरून ही सुटका शक्य असून, ही घुसखोरी जाणीवपूर्वक झालेली नसल्याचे मलेशियन सरकारला पटवून देण्याचा प्रयत्न संबंधित महाविद्यालयाच्या माध्यमातून सुरू आहे.
ठाण्यातील एसईएस (शेल एज्युकेशन सोसायटी) या कॉलेजचे संचालक मिलिंद कोळी यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली. त्यांचे स्पष्टीकरण पटल्यास हा दंड 5क्क् रिंगिटर्पयत कमी होऊ शकतो, असेही ते म्हणाले. तसेच जो काही दंडासह अन्य खर्च होत आहे तो सर्वच्या सर्व कॉलेजच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
सध्या ही सर्व मुले राजधानी क्वालालंपूर येथे भारतीय दूतावासाच्या मार्गदर्शनाखाली राहत असल्याचे सांगण्यात आले. तेथे दूतावास प्रमुख अनुराधा सुंदरमूर्ती या सर्वतोपरी काळजी घेत असल्याचे कोळी म्हणाले. मलेशियन कायद्यानुसार हा दंड 4क् हजार रुपये असून, प्रत्येक विद्याथ्र्याला तो भरणो शक्य नाही. त्यामुळे ही मुले एजंटाकडून फसवली गेली आहेत हे मलेशियन वकिलातीला पटवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ती एनओसी वकिलातीकडून मिळाल्यास 1क् हजार रुपयांच्या दंडावर ही मुले माघारी परतू शकतात. 
एसईएस कॉलेजचे प्रतिनिधीही क्वालालंपूर येथे पोहोचले असून, तेही मुलांच्या 
सुटकेसाठी प्रयत्न करीत आहेत. ठाण्यातील सिद्धेश देशमुख याच्यासह मलेशियातल्या 
ज्या एजंटने कॉलेज आणि इथल्या विद्याथ्र्याची फसवणूक केली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कॉलेज व्यवस्थापनाने परराष्ट्र 
व्यवहार मंत्रलय आणि मलेशियन वकिलातीकडे केली आहे.
 
भारतीय स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी ही मुले भारतात आणण्यासाठी स्वत: कोळी हे मलेशियात  रवाना होत असून, ते यासंदर्भात संबंधितांशी चर्चा करणार आहेत. याबाबत त्यांनी संबंधित विद्याथ्र्याच्या पालकांशीही चर्चा केली असून, त्यांनाही सर्व वस्तुस्थिती समजावून सांगितल्याचे ते म्हणाले.
 
बोगस व्हिसा आणि स्थानिक एजंटच्या जाचामुळे मलेशियात अडकलेल्या त्या विद्याथ्र्याची व्यथा शिवसेनेच्या खासदारांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रलयाकडे मांडल्यानंतर या मुलांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.
 
खासदार राजन विचारे व 
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह 
एसईएस कॉलेजच्या व्यवस्थापकांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. त्यानुसार मलेशिया येथील महाराष्ट्र मंडळानेही प्रयत्न केल्याचे ते सांगतात. 

 

Web Title: Students stuck in Malaysia return on Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.