शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

10th,12th Exam: कुठलाही ताण न घेता दहावी, बारावीच्या परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी सुरू ठेवावी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 06:09 IST

10th,12th Exam: इतर मंडळांनी दहावीच्या परीक्षांबाबत जाहीर केलेला पॅटर्न राज्य मंडळासाठी लागू होईल का?

प्रत्येक शिक्षण मंडळ स्वायत्त आहे. त्यांची स्वतःची धोरणे, निर्णय प्रणाली असते. सध्याची काेराेनाची परिस्थिती पाहता विद्यार्थी हित व सुरक्षितता लक्षात घेऊनच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. त्यानुसार नवीन वेळापत्रकाची आखणी हाेईल; मात्र इतर मंडळांप्रमाणेच निर्णय घेतला जाणार की नाही, याबद्दल आताच सांगता येणार नाही. काेराेनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. इतर मंडळांप्रमाणे परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनावर निकाल जाहीर करावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. त्यामुळेच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षेसंदर्भातील नेमकी काय भूमिका आहे, हे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांच्याकडून जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न.

नवीन वेळापत्रक विद्यार्थ्यांना कधीपर्यंत मिळेल ?नवीन वेळापत्रकासाठी मंडळाचे सदस्य काम करीत असून, त्याची आखणी करून लवकरात लवकर ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहाेचावे, असा आमचा प्रयत्न आहे. नियमित व दिव्यांग विद्यार्थ्यांना वाढीव वेळ, आपल्याच शाळेत / महाविद्यालयांत केंद्र, सुरक्षात्मक उपाययोजना या सवलती कायम राहतील. प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजनही अशाच प्रकारे हाेईल. जून महिन्यात परीक्षेचे वेळापत्रक लागणार असल्याने देण्यात आलेली जून महिन्यातील विशेष संधी विद्यार्थ्यांना पुन्हा दिली जाईल की नाही, याचा पुनर्विचार करण्यात येईल.

पालकांनी मागणी केलेल्या ऑनलाइन परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन अशा पर्यायांचा विचार सुरू आहे का?दहावी, बारावीच्या परीक्षांचे मूल्यमापन हा त्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्याचा पाया असतो. कुठे प्रवेश घ्यायचा, कोणती शाखा निवडायची, हे या मूल्यांकनावरूनच ठरते. त्यामुळे वरील पर्याय ही तात्पुरती व्यवस्था असली तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीनेही विचार व्हायला हवा. म्हणूनच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

निकाल कमीतकमी वेळात लागतील, यादृष्टीने काेणते प्रयत्न सुरू आहेत?सुरक्षित पद्धतीने परीक्षा घेणे हे जसे आव्हान आहे तसेच त्यांचा निकाल कमीत कमी वेळेत लावणे हे यंदाचे शिक्षण मंडळाचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने जिल्हा पातळीपासून राज्य पातळीपर्यंत यंत्रणेची चाचपणी केली जात आहे. विभागीय मंडळाकडून पेपर्स येण्याची वाट पाहण्यापेक्षा जिल्हा पातळीवर थेट शिक्षकांकडून त्यांचे कलेक्शन होईल, असे प्रयत्न सुरू आहेत.

शिक्षकांच्या लसीकरणासंदर्भात काय नियोजन आहे?सद्यस्थितीत राज्यातील ४५ वर्षे व त्यापुढील शिक्षक लसीकरण करून घेत आहेत, त्यांना तशा सूचना दिल्या आहेत. ४५ वर्षांखालील शिक्षक, पर्यवेक्षक, परीक्षांच्या कामात सहभागी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी शिक्षण मंडळाने आरोग्य विभागास प्रस्ताव दिला आहे. येत्या काही दिवसांत त्यावर निर्णयाची अपेक्षा असून, परीक्षेपूर्वी लसीकरण पूर्ण करून घेतले जाईल.

पालक, विद्यार्थ्यांसाठी काय संदेश आहे?काेराेनामुळे सुरक्षेची भीती विद्यार्थी, पालकांच्या मनात आहेच, शिवाय परीक्षा कशा पार पडतील, याचा मानसिक तणावही आहे; मात्र कुठलाही  ताण न घेेता   परीक्षेची तयारी सुरू ठेवा, मिळालेल्या वेळेकडे संधी म्हणून पाहत तिचा सदुपयोग करा. येणाऱ्या काळात आपण या परिस्थितीतून निश्चितच सुखरूप बाहेर पडून नवीन शैक्षणिक करिअरकडे वाटचाल करू, याची खात्री बाळगा.(मुलाखत : सीमा महांगडे)

 

टॅग्स :examपरीक्षा