परराज्यांतील विद्याथ्र्याना राज्य कोटय़ातून प्रवेश नाही
By Admin | Updated: July 13, 2014 01:59 IST2014-07-13T01:59:15+5:302014-07-13T01:59:15+5:30
राज्यासाठी राखीव असलेल्या कोटय़ातून एमबीबीएसला प्रवेश देता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने उच्च न्यायालयात सादर केले आह़े

परराज्यांतील विद्याथ्र्याना राज्य कोटय़ातून प्रवेश नाही
मुंबई : महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला असला तरी उच्च माध्यमिक परीक्षा (12 वी) परराज्यातून उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्याला राज्यासाठी राखीव असलेल्या कोटय़ातून एमबीबीएसला प्रवेश देता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने उच्च न्यायालयात सादर केले आह़े
सेंट जाज्रेस इस्पितळाचे संचालक व प्रशासकीय अधिकारी विनायक वसंतराव विसपुते यांच्या प्रतिज्ञापत्रतून राज्य सरकारने ही भूमिका मांडली आहे.हा नियम अनेक वर्षापासून लागू आह़े तसेच सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यात स्थानिक विद्याथ्र्याना एमबीबीएस प्रवेशात प्राधान्य देण्याचे निर्देश प्रत्येक राज्याला दिले आहेत़ त्यामुळे दुस:या राज्यात बारावीची परीक्षा उर्त्तीण झालेल्या विद्याथ्र्याकडे महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला असला तरी त्याला येथील कोटय़ातून एबीबीएसला प्रवेश देता येणार नाही़ असे केल्यास ते राज्यातील विद्याथ्र्यावर अन्याय करण्यासारखे होईल़
त्यातूनही राज्यासाठी 8क् तर राज्याबाहेर बारावी पूर्ण करणा:या विद्याथ्र्यासाठी 2क् टक्के जागा राखीव असतात़ तेव्हा राज्याबाहेर बारावी पूर्ण करणा:या विद्याथ्र्यानी 2क् टक्के कोटय़ातून प्रवेश घ्यावा, असेही प्रतिज्ञापत्रत नमूद करण्यात आले आह़े याप्रकरणी कल्याण येथील कीर्ती भराडीया हिने अॅड़ एम़ व्ही़ थोरात यांच्यामार्फत याचिका दाखल केली आह़े कीर्तीचे कुटुंब 196क् पासून कल्याण येथे राहात असून, तिच्याकडे महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला आह़े तिने दहावी देखील येथूनच केली़ मात्र तिने बारावी हैदराबाद येथून पूर्ण केली आह़े त्यामुळे तिला महाराष्ट्रातील कोटय़ातून एमबीबीएस प्रवेश नाकारण्यात आला़ हा प्रवेश नाकारणा:या नियमाला तिने या याचिकेत आव्हान दिले असून, हा नियम रद्द करण्याची मागणी केली आह़े विशेष म्हणजे 1997 च्या आधी महाराष्ट्राबाहेर बारावी करणा:यालाही येथे प्रवेश दिला जात होता, असा दावा तिने याचिकेत केला आह़े
याचे वरील प्रत्युत्तर शासनाने सादर केले आह़े तसेच एमबीबीएस प्रवेशासाठी घेण्यात येणा:या सीईटी परीक्षेच्या नियमावलीतच राज्याबाहेर बारावी पूर्ण करणा:या विद्याथ्र्याना महाराष्ट्रातील कोटय़ातून प्रवेश
दिला जाणार नसल्याचे नमूद केले
आह़े त्यामुळे कीर्तीने आता
राज्याच्या कोटय़ातून प्रवेशासाठी दावा करणो अयोग्य आहे, असेही प्रतिज्ञापत्रत नमूद करण्यात आले आह़े (प्रतिनिधी)
एबीबीएस प्रवेशासाठी बारावीला पन्नास टक्क्यांर्पयत गुण असणो व सीईटी परीक्षा उर्त्तीण होणो आवश्यक आह़े कीर्तीने या दोन्ही अटी पूर्ण केल्या आहेत़ त्यामुळे केवळ हैदराबाद येथून बारावी परीक्षा दिल्याने कीर्तीला महाराष्ट्राच्या कोटय़ातून एमबीबीएसला प्रवेश मिळणार की नाही, हे आता न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आह़े यावरील पुढील सुनावणी 22 जुलैला होणार आह़े