विद्यार्थ्यांना बीजगणित, भूमिती शिकवलेच नाही

By Admin | Updated: March 4, 2017 03:18 IST2017-03-04T03:18:10+5:302017-03-04T03:18:10+5:30

बीजगणित व भूमिती हे विषय मुलांना शिकवलेच नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.

Students have not taught algebra, geometry | विद्यार्थ्यांना बीजगणित, भूमिती शिकवलेच नाही

विद्यार्थ्यांना बीजगणित, भूमिती शिकवलेच नाही


मोखाडा : पळसुंडा आश्रमशाळेतील ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांना बीजगणित व भूमिती हे विषय मुलांना शिकवलेच नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. येथे नववीमध्ये ७७ आणि दहावी ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दहावीच्या मुलांची ७ मार्चला होणारी बोर्डाची परीक्षा ३ ते ४ दिवसांवर येऊन ठेपली असतानादेखील या मुलांना गणित विषय शिकवलाच नसल्याने बोर्डाच्या परीक्षेत गणित विषयाचा पेपर कसा लिहायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बोर्डाच्या परीक्षेचे महत्त्व विचारात घेऊन शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या विषयांचे अध्यापन पूर्ण झाल्यानंतरही मुलांच्या सराव चाचण्या घेतल्या जातात. परंतु, येथील विद्यार्थ्यांच्या सराव चाचण्या सोडा गणित, भूमितीची २-२ प्रकरणे थातूरमातूर शिकवून विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावले आहे. असे असतानाही वरिष्ठांना शिकवले, असे सांगा. याबाबत, विद्यार्थ्यांना दम भरला जात असल्याचे पालकांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे. तसेच गेल्या पाचसहा वर्षांपासून मोरे यांनी येथील विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवलाच नाही. यामुळे आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या मुख्याध्यापक मोरे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी पालकांनी अर्जाद्वारे प्रकल्प अधिकाऱ्यांकडे केली आहे. (वार्ताहर)
मुख्याध्यापक, प्रकल्प अधिकाऱ्यांची चुप्पी
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना बीजगणित व भुमिती विषय न शिकविल्याबद्दल माहितीसाठी मुख्याध्यापक मोरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. तसेच प्रकल्प अधिकारी पवणीत कोर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॉल घेतलाच नाही.

Web Title: Students have not taught algebra, geometry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.