विद्यार्थ्यांनी पूर्ण केले प्राध्यापकाचे अपूर्ण स्वप्न

By Admin | Updated: July 4, 2016 02:43 IST2016-07-04T02:43:56+5:302016-07-04T02:43:56+5:30

वनसप्ताहासोबत प्राध्यापक अविनाश कारंडे यांच्या स्मरणार्थ परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी बदलापूर येथे वृक्षारोपण केले.

Students complete their incomplete dream of Professor | विद्यार्थ्यांनी पूर्ण केले प्राध्यापकाचे अपूर्ण स्वप्न

विद्यार्थ्यांनी पूर्ण केले प्राध्यापकाचे अपूर्ण स्वप्न


मुंबई : वनसप्ताहासोबत प्राध्यापक अविनाश कारंडे यांच्या स्मरणार्थ परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी बदलापूर येथे वृक्षारोपण केले.
महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या एनएसएस (राष्ट्रीय सेवा योजना)तर्फे आणि प्राध्यापक अविनाश कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम ५ जून (पर्यावरण दिनी) आयोजित करण्यात आला होते. पण त्याच दिवशी सकाळी मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात अविनाश कारंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पर्यावरण दिनी अपूर्ण राहिलेला अविनाश सरांचा वृक्षारोपण कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी रविवारी एन.एस.एस., एनसीसी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी बदलापूर येथे विविध रोपट्यांचे रोपण केले. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य टी.पी. घुले उपस्थित होत्या. (युवा प्रतिनिधी)

Web Title: Students complete their incomplete dream of Professor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.