अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: June 7, 2016 07:42 IST2016-06-07T07:42:01+5:302016-06-07T07:42:01+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील घटना.

अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
वरवट बकाल (बुलडाणा) : दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे वरवट बकाल (जि. बुलडाणा) येथील एका विद्यार्थ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. वरवट बकाल येथील राहुल प्रवीण घुगे (१७) हा येथीलच नागेश्वर महाराज विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. सोमवारी निकाल असल्यामुळे तो विद्यालयात निकाल पाहण्यासाठी आला. मात्र, अनुत्तीर्ण झाल्याचे समजताच घरी जाताच त्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब वेळीच त्याच्या आईच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्याला सुरुवातीला वरवट बकाल येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला अकोला येथे हलविण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.