एसटी बस वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थी संतप्त
By Admin | Updated: August 1, 2016 01:53 IST2016-08-01T01:53:41+5:302016-08-01T01:53:41+5:30
एसटी बसच्या मागणीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी डोर्लेवाडीत एसटी बस रोखली.

एसटी बस वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थी संतप्त
डोर्लेवाडी : एसटी बसच्या मागणीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी डोर्लेवाडीत एसटी बस रोखली. पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी बसचा मार्ग रिकामा केला.
बारामती आगार व्यवस्थापकांकडे वेळोवेळी मोठ्या बसची मागणी विद्यार्थ्यांनी केली. मात्र, बस वेळेत नसल्याने अखेर गुरुवारी (दि. २८) एसटी बस रोखली. सकाळी ६.१५ वाजता बारामती ते सोनगाव येथेच ही मिनी बस प्रवाशांनी पूर्ण भरते. बसमध्ये जागा नसल्याने ही बस डोर्लेवाडी येथे थांबत नाही.
सकाळी मुलांचे महाविद्यालय लवकर सुरू होते; मात्र एसटी बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. बस रोजच थांबत नाही म्हणून आज सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी एसटी बस रोखली.
जवळपास १ तास बस रोखण्यात आली. परंतु, पंचायत समिती
सभापती डॉ. प्रतिभा नेवसे व ग्रामपंचायत सदस्य राधाबाई जाधव यांनी घटनास्थळी येऊन या
समस्येवर उपाययोजना करू असे विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतरच विद्यार्थ्यांनी एसटी बस सोडली.
आगार व्यवस्थापकांना अर्ज करूनदेखील ते दखल घेत नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक
नुकसान मोठ्या प्रमाणावर होत
आहे. (वार्ताहर)