शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् काही वेळासाठी सर्वच विसरले दहावीची परीक्षा; संपूर्ण शाळेत त्याचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 17:07 IST

विद्यार्थ्याला पाहून पर्यवेक्षक आश्चर्यचकीत

वाशिम: दहावीची परीक्षा जसजशी जवळ येऊ लागते, तसतसा प्रत्येकजण जोरदार अभ्यास करू लागतो. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू असतो. परीक्षा केंद्रावरदेखील पुस्तकात डोकं खुपसून अभ्यास करताना दिसतात. मात्र वाशिमच्या एका परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांचं लक्ष काही वेळासाठी विचलित झालं. एक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर येताच अनेक विद्यार्थी त्याकडे एकटक पाहू लागले. हा विद्यार्थी ज्या वर्गात परीक्षा देण्यासाठी गेला, तिथेदेखील सर्वचजण त्याच्याकडे पाहत होते. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याला पाहून पर्यवेक्षकदेखील चक्रावून गेले. दहावीची परीक्षा देण्यासाठी जऊळका रेल्वे येथील केंद्रावर गेलेल्या निलेश पंजाब डहानेला पाहताच सर्वच आश्चर्यचकीत झाले. कारण निलेशची उंची अडीच फूट इतकी आहे. त्याचं वय 16 वर्षे असलं, तरी त्याची शारीरिक वाढ झालेली नाही. त्यामुळे निलेश चुकून वर्गात आल्याचा पर्यवेक्षकांचा गैरसमज झाला. त्यामुळे सर्वच पर्यवेक्षकांनी याबद्दल शहानिशा केली. त्यावेळी तो दहावीचाच विद्यार्थी असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. निसर्गत:च निलेशची उंची कमी असल्यानं तो १६ वर्षे वयाचा वाटतच नाही. 'सुरुवातीच्या काळात आपल्याला उंचीबद्दल खंत वाटत होती. सर्व मित्रांची उंची किमान चार ते पाच फूट असताना आपण त्यांच्यात खूपच बुटके दिसत असल्याने वाईट वाटायचे. परंतु आता ती खंत राहिली नाही,' अशी भावना निलेशनं व्यक्त केली. सर्वसामान्यांप्रमाणेच आपण जीवन जगत असून, शैक्षणिक प्रगतीतून आपणास विकास साधायचा आहे. शारीरिक विकास हा प्रगतीसाठी महत्त्वाचा नसतो, असा अत्यंत प्रगल्भ विचार निलेशनं मांडला. 

टॅग्स :washimवाशिमexamपरीक्षाStudentविद्यार्थी