विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची क्राइम ब्रँचमार्फत चौकशी
By Admin | Updated: April 6, 2015 23:11 IST2015-04-06T23:11:34+5:302015-04-06T23:11:34+5:30
पनवेल जि. रायगड येथील खांदा वसाहतीमधील न्यू होरायझन स्कूल शाळेतील विद्यार्थ्याने चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली की,

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची क्राइम ब्रँचमार्फत चौकशी
मुंबई : पनवेल जि. रायगड येथील खांदा वसाहतीमधील न्यू होरायझन स्कूल शाळेतील विद्यार्थ्याने चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली की, त्याला आधी मारहाण केली व नंतर त्याची आत्महत्या दाखवली गेली याची चौकशी क्राईम ब्रँचमार्फत केली जाईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत केली.
न्यू होरायझन स्कूल शाळेतील गौरव दत्तात्रय कंक या विद्यार्थ्याने वर्गशिक्षिकेने शिक्षा केल्यामुळे आत्महत्या केली, असे उत्तर डॉ. पाटील यांनी दिले. मात्र, त्यावर शिवाजीराव नाईक यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, सदर मुलाला तुझी गर्लफ्रेंड कोण आहे, बॉयफ्रेंड कोण आहे,असे प्रश्न विचारले गेले. तेव्हा त्या मुलाने शिक्षिकेचा बॉयफ्रेंड कुलदीपसिंगचा उल्लेख केल्यामुळे शिक्षिकेने त्या मुलाला शिक्षा म्हणून वर्गात बसवून ठेवले. नंतर ती शिक्षिका आणि तिचा बॉयफ्रेंड कुलदिपसिंग यांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.