दादरमध्ये छबिलदास शाळेत विद्यार्थिनीवर बलात्कार
By Admin | Updated: January 9, 2016 21:48 IST2016-01-09T21:07:34+5:302016-01-09T21:48:05+5:30
दादरमधील छबिलदास शाळेतील एका विद्यार्थिनीवर कॅंटिन कर्मचा-यांने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.

दादरमध्ये छबिलदास शाळेत विद्यार्थिनीवर बलात्कार
>ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.९ - दादर पश्चिमेकडील एका नामांकित शाळेत पाचवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीवर शाळेच्या कॅन्टींनमध्ये काम करणा-या 20 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. सोमनाथ फेराई यादव असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दादर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या नामांकित छबिलदास शाळेत हा प्रकार घडला. याच शाळेत 9 वर्षीय चिमुकली पाचवी इयत्तेत शिक्षण घेत आहे. शुक्रवारी वार्षिक समारंभानिमित्त शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान कॅन्टींनमध्ये काम करत असलेल्या यादवने मुलीला बाथरुममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले.
रात्री उशिरार्पयत मुलगी घरी परतली नसल्याने मुलीच्या पालकांनी शोधाशोध सुरु केली. पालकांनी शाळेत जाऊन तिला शोधण्याचा प्रयत्न केला, असता पीडित मुलगी शाळेतील एका बाथरुममध्ये आढळून आली. घडला प्रकार मुलीने पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी यादवला अटक केली आहे. या घटनेमुळे विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.