उत्तरपत्रिका न दाखविणा-या विद्यार्थ्यास जबर मारहाण
By Admin | Updated: March 10, 2015 01:49 IST2015-03-10T01:49:49+5:302015-03-10T01:49:49+5:30
उत्तरपत्रिका पाहू न देणाऱ्या विद्यार्थ्यास मारहाण केल्याची घटना येथील डॉ. घोगरे विज्ञान महाविद्यालयातील केंद्रावर सोमवारी दुपारी घडली.

उत्तरपत्रिका न दाखविणा-या विद्यार्थ्यास जबर मारहाण
धुळे : उत्तरपत्रिका पाहू न देणाऱ्या विद्यार्थ्यास मारहाण केल्याची घटना येथील डॉ. घोगरे विज्ञान महाविद्यालयातील केंद्रावर सोमवारी दुपारी घडली.
घटनेच्या निषेधार्थ आदिवासी एकता परिषद व सम्यक विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय संयुक्त बैठकीत झाला. मात्र रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती.
सोमवारी घोगरे महाविद्यालय केंद्रावर बारावीचा जीवशास्त्राचा पेपर सोडविणाऱ्या नयन वाडिले या विद्यार्थ्याला त्याच्या पाठीमागील विद्यार्थ्याने तुझी उत्तरपत्रिका पाहू दे, अशी मागणी केली. परंतु नयनने त्यास विरोध दर्शविला. यामुळे संतापलेल्या संबंधित विद्यार्थ्याने (नाव समजलेले नाही) परीक्षा संपल्यावर १५-२० मित्रांच्या मदतीने केंद्राच्या आवारातच नयनला मारहाण केली.
नयन विटाभट्टी येथील
मागासवर्गीय वसतिगृहाचा विद्यार्थी आहे. (प्रतिनिधी)