विद्यार्थी विवाहित, म्हणून निकाल कमी!
By Admin | Updated: September 19, 2015 02:42 IST2015-09-19T02:42:30+5:302015-09-19T02:42:30+5:30
डीटीएडची (डिप्लोमा इन टिचर एज्युकेशन) परीक्षा देणारे बहुतांश विद्यार्थी विवाहित असल्यामुळेच संपूर्ण राज्यात निकाल कमी लागला, असे अफलातून उत्तर परीक्षा परिषदेच्या

विद्यार्थी विवाहित, म्हणून निकाल कमी!
अकोला : डीटीएडची (डिप्लोमा इन टिचर एज्युकेशन) परीक्षा देणारे बहुतांश विद्यार्थी विवाहित असल्यामुळेच संपूर्ण राज्यात निकाल कमी लागला, असे अफलातून उत्तर परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी दिले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यंदा डीटीएडचा निकाल संपूर्ण राज्यात अत्यल्प लागला असून, बहुतांश विद्यार्थ्यांना एटीकेटी सवलतीचा लाभदेखील घेता येणार नाही.
चांगला अभ्यास करूनही निकाल अत्यल्प लागल्याने विद्यार्थ्यांनी निकालावर आक्षेप नोंदवित पुनर्मूल्यांकनासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आर.व्ही. बोधने यांना निवेदन दिले होते. या निवेदनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.
आता विद्यार्थ्यांच्या निवेदनावर परीक्षा परिषदेच्या आयुक्तांचे उत्तर आले आहे. बहुतांश विद्यार्थी विवाहित असल्याने त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे डीटीएड परीक्षेचा निकाल राज्यभरात कमी लागला आहे, असा जावईशोध त्यांनी त्यात लावला.
समीक्षकांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका व्यवस्थित लिहिलेल्या नाहीत. (प्रतिनिधी)
बहुतांश विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीनंतर किमान पाच वर्षे व कमाल तीस वर्षांच्या कालावधीनंतर डीटीएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. परिणामी, असे विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.
- आर.व्ही. बोधने, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद