शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी निवडणुकांचा बिगुल वाजला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 12:17 IST

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका २५ वर्षांपूर्वी बंद झाल्या होत्या..

ठळक मुद्देविद्यापीठ विद्यार्थी परिषद : २४ सप्टेंबर रोजी मतदान तर २७ सप्टेंबर रोजी निकाल विद्यापीठाकडून महाविद्यालयांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर : ७ सप्टेंबरला मतदान

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. विद्यापीठाकडूनमहाविद्यालयांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ७ सप्टेंबरला मतदान होणार असून त्याचदिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल. यानंतर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक होणारआहे. दि. २४ सप्टेंबर रोजी मतदान तर दि. २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करणार आहे.

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका २५ वर्षांपूर्वी बंद झाल्या होत्या. या निवडणुकांमधील राजकीय पक्षांचा हस्तक्षेप व हिंसाचार वाढल्याने हा निर्णय घ्यावा लागला होता. आता पुन्हा नवीन विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालयांमध्ये निवडणुका सुरू झाल्या आहेत. विद्यापीठाने बुधवारी (दि. ३१) रात्री निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करत बिगुल वाजविला आहे. ही निवडणूक दोन टप्प्यांत होणार आहे. आधी महाविद्यालय स्तरावरील सभापती, सचिव, महिला प्रतिनिधी व वर्ग प्रतिनिधी या पदांसाठी निवडणूक होईल. त्यानंतर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी सभापती, सचिव, महिला प्रतिनिधी व मागासवर्गीय प्रतिनिधी या पदांसाठीची निवडणूक पार पडेल. महाविद्यालयांमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी विद्यापीठातील निवडणुकीसाठी मतदान करतील.निवडणूक वेळापत्रकानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, संस्था व विभागांमधील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांची अधिसूचना २१ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. २९ आॅगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणे, ५ सप्टेंबरला अर्ज माघारी घेणे आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी सर्व महाविद्यालयांमध्ये मतदान होईल. संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य सलग ४ तासांची मतदानाची वेळ निश्चित करतील. मतदानानंतर महाविद्यालयातच मतमोजणी करून लगेच निकाल घोषित केला जाईल. महाविद्यालयांमधील निवडणुका झाल्यानंतर लगेच ९ सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. १४ व १५ सप्टेंबरला अर्ज दाखल करणे, १९ व २० सप्टेंबरला अर्ज माघारी घेणे, २४ सप्टेंबर मतदान तर २७ सप्टेंबरला मतमोजणी व निकाल असा निवडणूक कार्यक्रम असेल. मतदानाची प्रक्रिया संबंधित महाविद्यालयात तर मतमोजणी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये होईल. निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे...........विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणूक वेळापत्रकच्दि. ९ सप्टेंबर - निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणे, तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध करणेच्दि. ११ सप्टेंबर - मतदार यादीवर लेखी आक्षेप नोंदवणेच्दि. १३ सप्टेंबर - आक्षेपांवर निर्णय घेतल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणेच्दि. १४ व १५ सप्टेंबर - उमेदवारी अर्ज दाखल करणेच्दि. १६ सप्टेंबर - अर्जांची छाननी करून वैध व अवैध अर्जांची यादी प्रसिद्ध करणेच्दि. १७ सप्टेंबर - अर्ज वैधतेबाबत आक्षेप सादर करणेच्दि. १८ सप्टेंबर - आक्षेपांवर निर्णय घेऊन वैध व अवैध अर्जाची यादी प्रसिद्ध करणेच्दि. १९ व २० सप्टेंबर - अर्ज माघारी घेणेच्दि. २० सप्टेंबर - पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणेच्दि. २४ सप्टेंबर - मतदानच्दि. २७ सप्टेंबर - मतमोजणी व निकालच्दि. २८ सप्टेंबर - एनएसएस/ क्रीडा/ एनसीसी/ सांस्कृतिक यातील सदस्यांचे नामनिर्देशन करणेच्दि. ३० सप्टेंबर ते १२ आॅक्टोबर - उमेदवारांच्या खर्चाचा हिशेब सादर करणे........महाविद्यालय विद्यार्थी परिषद निवडणूक वेळापत्रकच्दि. २१ ऑगस्ट - निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणेच्दि. २३ ऑगस्ट - मागासवर्ग प्रतिनिधी ठरविण्यासाठी आरक्षण सोडत आणि तुकडीनिहाय तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध करणेच्दि. २६ ऑगस्ट - मतदार यादीवर लेखी आक्षेप नोंदवणेच्दि. २७ ऑगस्ट - अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणेच्दि. २९ ऑगस्ट - उमेदवारी अर्ज दाखल करणेच्दि. ३१ ऑगस्ट - अर्ज छाननी करून वैध व अवैध अर्जांची यादी प्रसिद्ध करणेच्दि. ३ सप्टेंबर - अर्ज वैधतेबाबत आक्षेप सादर करणेच्दि. ४ सप्टेंबर - आक्षेपाबाबत सुनावणी घेणे, अपिलानंतर अंतिम अर्जाची यादी प्रसिद्ध करणेच्दि. ५ सप्टेंबर - अर्ज माघारी घेणे, उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणेच्दि. ७ सप्टेंबर - मतदान, मतदानानंतर मतमोजणी व निकालच्दि. ९ ते २१ सप्टेंबर - उमेदवारांच्या खर्चाचा हिशेब सादर करणे.............महाविद्यालय विद्यार्थी परिषद निवडणूक वेळापत्रकविद्यार्थ्यांचा विद्यापीठाची मान्यता असलेल्या पूर्णवेळ अभ्यासक्रमाला दि. २० आॅगस्टपर्यंत प्रवेश झालेला असावा.विद्यार्थ्याने एकाच वर्गात पुन्हा प्रवेश घेतलेला नसावा.विद्यार्थ्याने एटीकेटी घेतलेली नसावी.३० सप्टेंबर रोजी वयाची २५ वर्षे पूर्ण असावीत.राखीव  प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक........निवडणूक लढविण्यासाठी पात्रतउच्च  शिक्षणासाठी पहिल्यांदा प्रवेश घेतल्यापासून सात शैक्षणिक वर्षे पूर्ण केली असल्यास.कोणत्याही विद्यापीठ परीक्षेतील गैरप्रकारामध्ये शिक्षा झालेली असल्यास.नैतिक अध:पतनाचा अंतर्भाव असलेल्या कोणत्याही अपराधासाठी दोषी ठरविले असल्यास.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीElectionनिवडणूक