शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षकाला झोडपले; संतप्त पालकांचे रौद्ररुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 06:59 IST

सोमवारी सकाळी शाळा उघडताच पीडित विद्यार्थिनीचे पालक व काही नागरिकांनी शाळेत धाव घेतली. संतापलेल्या पालक, नागरिकांनी त्याला तेथेच झोडपण्यास सुरुवात केली़

उस्मानाबाद : शहरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकाने सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे़ यानंतर संतप्त पालकांनी त्या शिक्षकाला चांगलाच चोप दिला़ याप्रकरणी शिक्षकावर सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

उस्मानाबाद शहरातील एका नामांकित शाळेत शहरातीलच एक विद्यार्थिनी सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे़ दरम्यान, वर्गात कोणीही नसताना या शाळेतीलच एक ५० वर्षीय शिक्षक या विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे करीत होता़ सातत्याने हा प्रकार होत असताना शिक्षक विद्यार्थिनीस धमकावत असल्याचेही कळते़ दरम्यान, शनिवारीही या शिक्षकाने पीडित विद्यार्थिनीसोबत पुन्हा चाळे केले़ यामुळे भेदरलेल्या विद्यार्थिनीने रडत-रडतच घर गाठून कुटूंबियांना याबाबतची कल्पना दिली़ मात्र, रविवारची शाळेला सुटी असल्याने या प्रकाराला वाचा फुटली नाही़ सोमवारी मात्र, पालकांनी शिक्षकाला घेरून चांगलेच चोपले.आरोपी शिक्षकाला अटकसोमवारी सकाळी शाळा उघडताच पीडित विद्यार्थिनीचे पालक व काही नागरिकांनी शाळेत धाव घेतली. संतापलेल्या पालक, नागरिकांनी त्याला तेथेच झोडपण्यास सुरुवात केली़ या शिक्षकास चोप देत पालकांनी शहर पोलीस ठाणे गाठले व त्याला पोलिसांच्या स्वाधीन करुन तक्रार नोंदविली़ त्यानुसार आरोपी शिक्षकाविरुद्ध विनयभंग व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आरोपी शिक्षकास अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक कस्तुरे यांनी दिली़ या शिक्षकाला यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले होते़

टॅग्स :MolestationविनयभंगSchoolशाळा