विद्यार्थ्याने रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट

By Admin | Updated: September 25, 2014 04:27 IST2014-09-25T04:27:33+5:302014-09-25T04:27:33+5:30

शाळेतून घरी पोहोचण्यास उशीर झाल्याने घरची मंडळी रागावतील, या भीतीने एका शाळकरी विद्यार्थ्याने स्वत:च्याच अपहरणाचा कट रचल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला.

The student created the cut of his own abduction | विद्यार्थ्याने रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट

विद्यार्थ्याने रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट

बुलडाणा : शाळेतून घरी पोहोचण्यास उशीर झाल्याने घरची मंडळी रागावतील, या भीतीने एका शाळकरी विद्यार्थ्याने स्वत:च्याच अपहरणाचा कट रचल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला.
शहरातील एडेड विद्यालयात वेदान्त शेळके हा इयत्ता पाचवीमध्ये शिकतो. शाळेला दांडी मारून बुधवारी सकाळी ११.३० वाजता मित्रासोबत तो चिंचा तोडण्यासाठी शाळा परिसरात गेला. चिंचा तोडत असताना एका वृद्ध महिलेने त्याला हटकून त्याचे दप्तर ताब्यात घेतले. त्या महिलेने दमदाटी करून दप्तर परत केले; परंतु त्यामुळे शाळेला उशीर झाला. आता शिक्षकांना काय सांगावे, असा प्रश्न त्याला पडला. यातूनच स्वत:च्या अपहरणाचा कट रचला़ शाळेत गेल्यानंतर शिक्षकाने विचारणा केली असता, त्याने दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात इसमांनी आपले तोंड दाबून उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली, असेही त्याने सांगितले. शिक्षकांनी ही माहिती पोलिसांना दिली. तपासासाठी पोलिसांनी मुलाची सखोल चौकशी केली असता, त्याच्या अपहरणाचा प्रयत्न झालाच नसल्याचे लक्षात आले. (प्रतिनिधी)

Web Title: The student created the cut of his own abduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.