चोरीच्या आळ आल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2016 14:04 IST2016-07-24T14:04:07+5:302016-07-24T14:04:07+5:30

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ननाशी आश्रम शाळेतील २१ जुलै पासून बेपत्ता असलेल्या १३ वर्षीय सातवीच्या विद्यार्थिनींचा मृतदेह आश्रमशाळेच्या मागील विहिरीत आढळला.

Student committed suicide due to theft? | चोरीच्या आळ आल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या ?

चोरीच्या आळ आल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या ?

ऑनलाइन लोकमत 

दिंडोरी, दि. २४ - नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ननाशी आश्रम शाळेतील २१ जुलै पासून बेपत्ता असलेल्या १३ वर्षीय सातवीच्या विद्यार्थिनींचा मृतदेह आश्रमशाळेच्या मागील विहिरीत आढळला असून चोरीचा आरोप सहन न झाल्याने तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
 
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील कवडासर येथील कुमाली मुरलीधर वार्डे वय १३ ही विद्यार्थिनी ननाशी येथील शासकीय आश्रमशाळेत पहिलीपासून शिकत होती. तेथेच वसतिगृहात राहत होती. दि २० जुलै रोजी तिने १०० रुपये चोरल्याचा तीच्यावर आळ घेण्यात आल्याची चर्चा आहे. 
 
त्यानंतर २१ जुलै रोजी तिचे पालकांना बोलावून घेण्यात आले होते. त्यानंतर पालकांसमोरच ती गायब झाली. त्यानंतर पालकांनी तिचा शोध घेतला परंतु ती सापडली नाही अखेर आज २४ जुलै रोजी सकाळी आश्रम शाळेमागील विहिरीत तिचा मृतदेह तरंगताना आढळला. याबाबत पेठ पोलिसांना कळविण्यात आले असून पेठ पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करून तपास सुरु केला आहे. 

Web Title: Student committed suicide due to theft?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.