एसटीची जम्बो भरती!

By Admin | Updated: December 31, 2014 02:04 IST2014-12-31T02:04:14+5:302014-12-31T02:04:14+5:30

एसटी महामंडळाकडून यंदा गणेशोत्सवापूर्वी चालकांची भरती केलेली असतानाच आता नवीन वर्षात महामंडळाकडून आणखी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

STT jumbo recruitment! | एसटीची जम्बो भरती!

एसटीची जम्बो भरती!

सुशांत मोरे ल्ल मुंबई
एसटी महामंडळाकडून यंदा गणेशोत्सवापूर्वी चालकांची भरती केलेली असतानाच आता नवीन वर्षात महामंडळाकडून आणखी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वर्षात मे महिन्यापर्यंत ७ हजार चालकांची भरती केली जाणार असल्याचे एसटी महामंडळातील सूत्रांनी सांगितले.
एसटी महामंडळाने गणेशोत्सवापूर्वी मुंबई विभागात २,८00 चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी
२३ मार्च रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर १६ ते २७ जूनपर्यंत एसटीच्या मुंबई विभागात विद्याविहार येथे शारीरिक पात्रता छाननी आणि कागदपत्रांची छाननी करण्यात आली.
ही सर्व प्रक्रिया पार पडेपर्यंत आणि चालक ताफ्यात येईपर्यंत बराच उशीर झाला. या भरती प्रक्रियेतील १,४00 चालक मिळाले असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. उर्वरित चालक महामंडळाला मिळाले नसून त्यामुळे मुंबई विभागात त्यांची कमतरता असल्याचे सांगण्यात आले. हे पाहता नवीन वर्षात चालकांची मोठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

जवळपास ७ हजार चालकांची भरती मे २0१५पर्यंत केली जाणार असून, त्याची लवकरच प्रक्रियाही सुरू केली जाईल. गर्दीच्या हंगामात हे चालक मिळण्यासाठी एसटी प्रयत्नशील असेल, असेही सांगण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे आधीच्या भरतीतील राहिलेले १,४00 चालकही या नवीन भरतीत समाविष्ट असतील.

Web Title: STT jumbo recruitment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.