शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची 17 टक्के भाडेवाढ तत्काळ लागू; किमान तिकिटासाठी आकारणार जादा ५ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 07:51 IST

ST bus : एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात आली.

मुंबई : कोरोनामुळे आर्थिक डोलारा कोसळलेल्या एसटी महामंडळाने तीन वर्षांनंतर प्रथमच १७.१७ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. ही भाडेवाढ सोमवारी मध्यरात्रीपासून लागू झाली. तिकीट दरात किमान ५ रुपयांनी वाढ होणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

इंधनाचे भरमसाट वाढलेले दर, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतीमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाकडे भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता. भाडेवाढीचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला होता, मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती. सोमवारी मंजुरी मिळाल्यानंतर भाडेवाढीचा निर्णय लागू करण्यात आला आहे.

एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात आली. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे, अशा प्रवाशांकडून नव्या दरानुसार दरातील फरकातील रकमेची आकारणी केली जाईल, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

महागाई भत्त्यात ५ टक्के वाढएसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यात आली असून दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना ५ हजार तर, कर्मचाऱ्यांना २५०० देण्यात येणार आहेत. याचा लाभ सुमारे ९३ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना होईल. ऑक्टोबरचा पगारही नोव्हेंबरच्या १ तारखेला होईल.

खासगी ट्रॅव्हल्सची भरमसाट दरवाढएसटीचा प्रवास महागला असताना, खासगी ट्रॅव्हल्सनीही दरवाढ केल्याने खिशावर अतिरिक्त ताण पडणार आहे. मुंबईहून औरंगाबाद, सातारा आणि कोल्हापूर मार्गावर सर्वाधिक दरवाढ आहे. ही वाढ ३०० ते ७०० रुपयांच्या घरात आहे. कोकणचा प्रवासही दोनशे रुपयांनी महागला आहे.

रातराणीच्या प्रवास भाड्यात दिलासाएसटी महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी, रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर ५ ते १० रुपयांनी कमी करत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे.

अशी असेल भाडेवाढनव्या तिकीट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच ६ कि.मी.नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयांच्या पटीत असणार आहे.

नवे तिकीट दरमार्ग    सध्याचा दर    नवीन दर    तफावतमुंबई-काेल्हापूर    ₹ ४८५    ₹ ५६५    ₹ ८०मुंबई-औरंगाबाद     ₹ ७४०     ₹ ८६०     ₹ १२०पुणे-अकोला     ₹ ६१०     ₹ ७१५     ₹ १०५दादर-स्वारगेट (शिवशाही)     ₹ ४५०     ₹ ५२५     ₹ ७५

टॅग्स :state transportएसटीMaharashtraमहाराष्ट्र