अनैतिक संबंधातून एकाच्या गुप्तांगावर वार

By Admin | Updated: October 23, 2016 22:26 IST2016-10-23T22:26:27+5:302016-10-23T22:26:27+5:30

इंदिरानगरमधील जयराम विलास पाटोळे याने उमेश ऊर्फ विक्रम जिजाबा चव्हाण याच्या गुप्तांगावर चाकूने वार केल्याची फिर्याद वडूज पोलिस ठाण्यात नोंद

Struggling on one's guttedang in relation to immorality | अनैतिक संबंधातून एकाच्या गुप्तांगावर वार

अनैतिक संबंधातून एकाच्या गुप्तांगावर वार

>आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 23 -  खटाव तालुक्यातील इंदिरानगरमधील जयराम विलास पाटोळे याने उमेश ऊर्फ विक्रम जिजाबा चव्हाण याच्या गुप्तांगावर चाकूने वार केल्याची फिर्याद वडूज पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, उमेश चव्हाण यास अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवार, दि. २३ रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास जयराम विलास पाटोळे (वय ३४ ) याने उमेश जिजाबा चव्हाण यास फोन करून बोलावून घेतले. उमेश हा दुचाकीवरून आल्यानंतर जयरामने मायणी येथील साठे मळ्याजवळ दुचाकी थांबविली. यावेळी जयराम याने उमेश यास ‘तू अनैतिक संबंध ठेवतो,’ असे म्हणून खिशातून चाकू काढून डाव्या गालावर वार केला. या हल्ल्यात उमेशच्या गालातून रक्तस्त्राव होऊ लागला.
 
यानंतर उमेश यास जयरामने खाली पाडले व त्याला निर्वस्त्र करून गुप्तांगावर वार केले. यानंतर तो निघून गेला. या हल्ल्यात उमेश हा गंभीररीत्या जखमी झाला. काही वेळाने ‘तुमच्या उमेशला मायणीमधील रुग्णालयात दाखल केले आहे,’ असे फोनवरून उमेशच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले. यानंतर उमेशच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. रक्तस्त्राव जास्त होत असल्यामुळे अधिक उपचारासाठी उमेशला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
उमेशने घडलेला प्रकार आईजवळ बोलून दाखविला त्यानुसार वडूज पोलिसांनी फिर्याद दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी जयराम विलास पाटोळे यास अटक केली. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक डी. आर. साळी करीत आहेत. 

Web Title: Struggling on one's guttedang in relation to immorality