‘कामगारांचे ठिय्या आंदोलन

By Admin | Updated: August 20, 2015 00:44 IST2015-08-20T00:44:58+5:302015-08-20T00:44:58+5:30

विल्होळी येथील पॉवरडील या कंपनीत गेल्या दोन महिन्यांपासून टाळेबंदी असल्याने कंपनीच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी गंगापू रोडवर

'Struggling agitation of workers | ‘कामगारांचे ठिय्या आंदोलन

‘कामगारांचे ठिय्या आंदोलन

नाशिक : विल्होळी येथील पॉवरडील या कंपनीत गेल्या दोन महिन्यांपासून टाळेबंदी असल्याने कंपनीच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी गंगापू रोडवर कंपनीच्या मालकाच्या घरासमोर ठिय्या दिला. दरम्यान, कामगारांनी अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारावर हुल्लडबाजी करीत दमबाजी केल्याची तक्रार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक महेश खैरनार यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
पॉवरडीलचे व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात गेल्या दोन महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. पॉवरडील व्यवस्थापन व कामगार यांच्यात नाशिकच्या औद्योगिक न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाची सोमवारी सुनावणी होती. न्यायालयाने पुढील सुनावणी ४ सप्टेंबरला ठेवली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून टाळेबंदी सुरू असल्याने कामगारांनी मंगळवारी सकाळी ८.३0 वाजेच्या सुमारास अचानक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक महेश खैरनार यांच्या घरासमोर जमा होत ठिय्या मांडला. यावेळी कामगारांनी घोषणाबाजीही केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, खैरनार यांनी पोलिसांना सदर प्रकाराची माहिती दूरध्वनीद्वारे कळविली. खैरनार यांनी या साऱ्या प्रकाराबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात कामगारांविरुद्ध दमबाजी व दहशत निर्माण केल्याची तक्रार दाखल केली आहे.

Web Title: 'Struggling agitation of workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.