कष्टकरींचा धडक मोर्चा

By Admin | Updated: June 9, 2016 03:45 IST2016-06-09T03:45:15+5:302016-06-09T03:45:15+5:30

मंगळवारी जव्हार प्रांत कार्यालयावर विविध मागण्यांसाठी प्रांत कार्यालयावर शेकडो कार्यकर्त्यांनी धडक मोर्चा काढण्यात आला.

Struggle for the Troubles | कष्टकरींचा धडक मोर्चा

कष्टकरींचा धडक मोर्चा


जव्हार : वन हक्क कायद्याची अमलबजावणी करून गरिबाला न्याय देन्यास शासन कुठेतरी कमी पडतंय या वन हक्क दाव्यांसाठी लागवडी खालील वाढीव क्षेत्रासाठी मंगळवारी जव्हार प्रांत कार्यालयावर विविध मागण्यांसाठी प्रांत कार्यालयावर शेकडो कार्यकर्त्यांनी धडक मोर्चा काढण्यात आला.
जव्हार मांगेल आळी, अंबिकाचौक, गांधीचौक, यशवंतनगर मोर्चावरून कष्टकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवार रोजी धडक मोर्चा काढण्यात आला.या मोर्चा दरम्यान प्लॉट धारकांना मापून दिलेले प्लॉटचे क्षेत्र वाढवून देण्यात यावे, वन खात्यांच्या प्रतीदिनी संबधित वन हक्क कागदपत्रांवर साह्या कराव्यात. उपविभागीय स्तरीय समितीने सर्व प्रलंबित दिलेले दावे त्विरत मान्य करावे, मोखाडा तालुक्यातील वैतरणा धरणामुळे वन जमिनीतून विस्थापित झालेल्या आदिवासींचे दावे समतिीने मंजूर करावे. जी.पी. एस मशीनने फेर मोजनी पूर्ण करावी.
प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी जव्हार, मोखाडा, वाडा, विक्र मगड तालुक्यातील शेकडो आदिवासी शेतकरी काष्टकरी या मोर्चात सहभागी झाले होते.
हा मोर्चा जव्हार प्रांत कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चाचे आयोजन जव्हार-महादू वांगड, बाबुराव वांगड विक्र मगड, अंकुश लोखंडे जव्हार, शिवाजी गोडे, संजय भोईर वाडा, भगवान कचरे, यशवंत गुरव, व शेकडो आदिवासी
शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Struggle for the Troubles