शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

जगण्याचा संघर्ष आणि अवघ्या विसाव्या वर्षी शिवसेनेत प्रवेश, आनंद दिघे यांच्या पश्चात... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 12:05 IST

आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. शिवसेनेत आले त्यावेळी एकनाथ शिंदे अवघ्या २० वर्षांचे होते

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यांच्या वडिलांनी रोजगार मिळवण्यासाठी गावावरून ठाणे गाठले. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागले. शिक्षण सोडून शिंदेंनी मग मासळी बाजारात काम सुरू केले. त्याबरोबर वडिलांनी घेतलेला टेम्पो चालवला. परिस्थितीशी दोन हात करत असलेल्या शिंदेंनी काही वर्षे रिक्षाही चालवली. जगण्याचा हा संघर्ष सुरू असताना त्या काळात ठाण्यात राजकीय हालचालींना वेग आला होता. शिवसेना मुंबईबाहेर पडत होती. त्यावेळचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण होत होता. एकनाथ शिंदेही शिवसेनेकडे ओढले गेले. त्यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. शिवसेनेत आले त्यावेळी एकनाथ शिंदे अवघ्या २० वर्षांचे होते

२०१९ मध्ये मुख्यमंत्रिपदाची हुलकावणी -२०१४ मध्ये सुरुवातीचे काही महिने भाजपने राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली तेव्हा शिवसेनेने शिंदेंची विधानसभेतील गटनेतेपदी निवड केली. त्यामुळे शिंदे विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर भाजप आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर फडणवीस सरकारमध्ये शिंदेंना नगरविकासमंत्री करण्यात आले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली व त्यांच्या युतीला स्पष्ट बहुमतही मिळाले. पण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांचे नाव ठरल्याची चर्चा होती. परंतु ऐनवेळी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाची गळ घातली. ठाकरेंनी ही विनंती मान्य केली. त्यामुळे शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाची संधी हुकली.

आनंद दिघे यांच्या पश्चात... शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर ठाण्यात शिवसेना संपली, असे चित्र विरोधकांनी निर्माण केले होते. एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेला सावरण्याचे काम केले. दिघे यांच्या जाण्याने आधार तुटलेल्या शिवसैनिकांना धीर दिला. शिंदे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. २००५ मध्ये ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी शिवसेना केवळ एकसंध ठेवली नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत केली. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी प्रथमच ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला. २०१७ साली झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेची प्रथमच एकहाती सत्ता आली. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी महापालिका, तर अंबरनाथ, बदलापूर नगरपरिषद या सर्व ठिकाणी शिवसेनेला सत्ता मिळाली.

जिद्दीने पूर्ण केले पदवीचे शिक्षणशिंदे यांनी मंगला हायस्कूलमधून ११वीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी मुक्त विद्यापीठातून मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन बीएची परीक्षा ७७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण केली.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची धुरा शिंदे यांच्या खांद्यावर१. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग २. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग क्षमता विस्तार३. वांद्रे-वर्सोवा सी लिंक ४. ठाणे खाडीवरील वाशी येथे तिसरा पुल ५. ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग ६. शीळ-कल्याण रुंदीकरण ७. ठाणे-घोडबंदर उन्नत रस्ता- भाजपप्रणीत सरकारमध्ये २०१४ मध्ये शिंदे यांच्या खांद्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्या सरकारमध्ये दिवाकर रावते, रामदास कदम असे अनुभवी सहकारी असतानाही शिंदे यांनी आपल्या कामाने छाप पाडली होती.- नागपूर ते मुंबई हे १४ तासांचे अंतर अवघ्या सहा ते आठ तासांवर आणण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले. या प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. 

विविध खात्यांचे मंत्री म्हणून घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय- विदर्भात रेल्वेच्या २७ उड्डाणपूलाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न - राज्यातील द्रुतगती मार्गावरील उपधान कमी करण्यासाठी विविध उपाययोजना- ओझर्डे येथे ट्रामा केअर सेंटर- आरोग्य मंत्रीपदाच्या काळात आशा सेविकांची पगारवाढ- आदिवासी व दुर्गम भागात काम करणाऱ्या बीएएमएस पदवीधारक कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय- ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास- एमएसआरडीला क्लस्टर योजना सुरु केली

राजकारणातील चढता क्रम- १९९७ मध्ये ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड- २००१ मध्ये ठाणे मनपात सभागृह नेतेपदी निवड- २००१ ते २००४ सलग तीन वर्षे ठाणे मनपात सभागृह नेतेपदी- २००४ - ठाणे विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले- २००५ - ठाण्याचे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती- २००९, २०१४, २०१९ मध्ये सलग विधानसभेमध्ये निवडून गेले- २०१४ - फडणवीस सरकारच्या कार्यकाळात विरोधी पक्षनेतेपद- २०१४ - सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री- २०१९ - महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा कॅबिनेट मंत्री- ३० जून २०२२ - राज्याचे मुख्यमंत्री 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाChief Ministerमुख्यमंत्रीthaneठाणे