शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पक्षकारांना निष्कारण त्रास देण्याच्या वृत्तीवर ताशेरे

By admin | Updated: March 18, 2016 02:37 IST

मुळात कायद्यानुसार न्यायालयात सादर करायच्या अर्जासोबत जो दस्तावेज जोडण्याची गरजच नाही असा दस्तावेज न जोडल्याचा आक्षेप घेऊन संबंधित प्रकरण न्यायालयापुढे सुनावणीसाठी

मुंबई : मुळात कायद्यानुसार न्यायालयात सादर करायच्या अर्जासोबत जो दस्तावेज जोडण्याची गरजच नाही असा दस्तावेज न जोडल्याचा आक्षेप घेऊन संबंधित प्रकरण न्यायालयापुढे सुनावणीसाठी लावण्याचे रोखून ठेवून पक्षकारांना निष्कारण त्रास देण्याच्या स्वत:च्याच प्रशासनाच्या वृत्तीवर मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे मारले आहेत.बुधवारी दिलेल्या निकालपत्रात हे ताशेरे मारताना न्या. गौतम पटेल न्यायालयाच्या प्रशासनास उद्देशून लिहितात, या वृत्तीमुळे न्यायालयांविषयी वाईट प्रतिमा जनमानसात तयार होते. न्याय मागण्यासाठी येणाऱ्या पक्षकाराला, निरर्थक अशी आडमुठी भूमिका घेऊन, आपण अमूक-तमूक करता येऊ शकत नाही, असे सांगून वाटेला लावू शकत नाही. लोकांचे कायद्याच्या समस्या सोडविण्यासाठी न्यायालये आहेत व प्रत्येक समस्येवर कायद्याने तोडगा काढला जाऊ शकतो. हे करत असताना आपण कायद्याचे पालन जरूर करायला हवे. पण जेथे कायद्यात एखादे बंधन नाही, असे बंधन नियम अथवा कार्यपद्धतीच्या नावाने घालणे न्यायाला साथ देणार नव्हे तर त्यात बाधा आणणारे आहे.कल्याण येथील विनिता अंकित वर्मा या विधवेने वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यांचे पती अंकित भगवतीचरण वर्मा यांचे गेल्या वर्षी ११ मे रोजी निधन झाले. आपण आणि १६ वर्षांची मुलगी व आठ वर्षांचा मुलगा असे तिघे दिवंगत अंकित यांचे वारस असल्याचे विनिता यांनी त्यांच्या अर्जात म्हटले होते. तसेच अंकित यांच्या आईचे त्यांच्याआधीच निधन झाल्याने नमूद केले होते. विनिता यांनी अर्जासोबत अंकित यांचा मृत्यूदाखला व दोन्ही मुलांचे जन्मदाखले जोडले होते. परंतु अंकितच्या आईचा मृत्यूदाखला जोडला नाही, असा आक्षेप घेऊन प्रशासनाने त्यांचा अर्ज रोखला होता. प्रशासनाने ज्या मृत्यू दाखल्याचा आग्रह धरला तसा दाखला सादर करणे अपेक्षितच नाही, असा निष्कर्ष न्या. पटेल यांनी नोंदविला. अशा कोणत्याही प्रकरणात न्यायालयाने कारणास्तव अशा पूर्वमृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृत्यूदाखला सादर करण्याचे निर्देश दिल्याखेरीज तसा दाखला अर्जासोबत जोडण्याचा आग्रह धरू नये, असे निर्देशही त्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)सर्व आयुष्य यातच जाईलन्या. पटेल यांनी म्हटले की, मुळात वारसा प्रमाणपत्रामुळे ते घेणाऱ्यांना मृताच्या संपत्तीत कोणताही कायदेशीर हक्क मिळत नाही. त्यामुळे मृताच्या पश्चात त्याच्या मालमत्तेचे अशा व्यक्ती फार अशा प्रमाणपत्रामुळे व्यवस्थापक ठरतात. अशा प्रामणपत्रासाठी केलेल्या अर्जासोबतही आधीच्या पिढ्यांच्या मृत्यूदाखल्यांचा प्रशासन आग्रह धरू लागले तर पक्षकाराचे संपूर्ण आयुष्य असे दाखले गोळा करण्यातच जाईल. कारण एकदा अशी निरर्थक मागणी करायची म्हटले की, ती केवळ लगेचच्या मागच्या पिढीपुरती मर्या दित न राहता कितीही पिढ्यांपर्यंत मागे जाऊ शकेल.