गो आॅइलची दमदार सुरूवात

By Admin | Updated: June 8, 2016 05:05 IST2016-06-08T05:05:21+5:302016-06-08T05:05:21+5:30

आॅईल रिफायनरी उद्योगात अग्रेसर असलेल्या गजानन ग्रुप आॅफ कंपनीज्ने गो आॅईल हे नवीन खाद्यतेल बाजारात आणले आहे.

The strong start of Go Aiege | गो आॅइलची दमदार सुरूवात

गो आॅइलची दमदार सुरूवात


ठाणे : आॅईल रिफायनरी उद्योगात अग्रेसर असलेल्या गजानन ग्रुप आॅफ कंपनीज्ने गो आॅईल हे नवीन खाद्यतेल बाजारात आणले आहे. नुकताच मुंबईतील गोरेगाव येथे गो आॅईल ब्रॅण्डचा उद्घाटन सोहळा झाला. सैराट चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. गो आॅइल हे कंपनीच्या ‘हेल्दी आॅईल, हेल्दी लिव्हिंग’ या विचारसरणीवर आधारित असून ग्राहक कायम आरोग्यपूर्ण आहाराबाबत दक्ष असतात. हे लक्षात घेवून आॅईल तयार केले असून ग्राहकांची ते पसंती ठरेल, असे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नितीन जाधव यांनी सांगितले.

Web Title: The strong start of Go Aiege