पंतप्रधानांच्या सभेसाठी तगडा बंदोबस्त
By Admin | Updated: October 7, 2014 01:07 IST2014-10-07T01:07:09+5:302014-10-07T01:07:09+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज होणाऱ्या सभेसाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. तीनशेवर अधिकारी आणि सुमारे दोन हजार पोलीस कर्मचारी सभास्थळी अर्थात कस्तूरचंद पार्कला

पंतप्रधानांच्या सभेसाठी तगडा बंदोबस्त
तळप बु.(वाशिम) : परिसरातील खेड्या-पाड्यामध्ये सद्यस्थितीत दिवसाला फक्त दोनच तास विज मिळत असल्याने सिंचन कसे करावे, असा प्रश्न परिरातील शेतकर्यांसमोर उभा राहिला आहे.
परिसरातील तळप, कार्ली, बोरव्हा, यशवंतनगर येथील पीके पावसाअभावी सुकत असल्यामुळे या िपकांना पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. पिकांना पाणी दिले नाही, तर शेतकर्यांच्या हाती काहीच येणार नाही. आज ग्रामीण भागात विज वितरण कंपनीने अन्यायकारक आणि पक्षपाती धोरण राबविल्यामुळे शेतकर्यांना सिंचनासाठी विज मिळणे कठीण झाले. परिणाम शेती सिंचन कसे करावे असा मोठा प्रश्न शेतकर्यासमोर उभा राहिला आहे. तळप बु. परिसरामध्ये दिवसा २ ते ४ वाजेपर्यंंंत विज चालू असते. म्हणजे शेतकर्यांना सिंचनासाठी दोन तास विज मिळते. रात्री ८.३0 वाजता पुन्हा विज येते आणि रात्रीला ३ वाजता विज गायब होते पुरेशा दाबाअभावीे विज मिळत नाही. रात्रीला ६ तास आणि दिवसा दोन अशी वीज मिळते. परिणाम ग्रामीण भागातील शेतीसिंचन धोक्यात आले आहे. शिवाय विजेअभावी ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनाही बंद राहत आहे. त्यामुळे घरगुती पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीकडून ग्रामीण भागासोबत पक्षपातीपणाचे धोरण अवलंबविल्या जात आहे.
शहरी भागात ६ तास भारनियमन तर ग्रामीण भागात १३ तास भारनियमन केल्या जात आहे. भारताला कृषी प्रधान देश म्हटले जाते परंतु तशी वागणूक कृषीक्षेत्राला मिळत नाही. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागावर नेहमी विज वितरण कंपनीकडून अन्यायाचे धोरण अवलंबविल्या जाते. ग्रामीण भागातील भारनियमन कमी करून योग्य दबाने विज देण्याची मागणी शेतकर्यामधून आणि नागरिकामधून होत आहे.