मान्सूनचे पुण्यात जोरदार आगमन
By Admin | Updated: June 12, 2017 15:35 IST2017-06-12T15:35:07+5:302017-06-12T15:35:07+5:30
मॉन्सूनबरोबरच शहरात सोमवारी जोरदार पावसाच्या सरीचे आगमन झाले. सोमवारी सकाळपासूनच शहरात ढग दाटून आले होते

मान्सूनचे पुण्यात जोरदार आगमन
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 12 मॉन्सूनबरोबरच शहरात सोमवारी जोरदार पावसाच्या सरीचे आगमन झाले़ सोमवारी सकाळपासूनच शहरात ढग दाटून आले होते. साधारण दुपारी १ वाजल्यापासून शहराच्या विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली़ शहराच्या अनेक भागात पाणी साचले. शहरातील अनेक शाळा आजपासूनच सुरु झाल्या़ त्यात पावसाची सुरुवात झाल्याने पालक व मुलांची एकच धांदल उडाली़

दोन वर्षांपूर्वी २०१५ रोजी मॉन्सून १२ जूनला पुण्यात दाखल झाला होता़ गेल्या दहा वर्षात २००६ मध्ये सर्वात अगोदर ३१ मे रोजी मॉन्सून पुण्यात आला होता़
पुण्यात मॉन्सून दाखल झालेला दिवस
२०१६२० जून
२०१५१२ जून
२०१४१५ जून
२०१३ ८ जून
२०१२ १७ जून
२०११ ४ जून
२०१० ११ जून
२००९२१ जून
२००८७ जून
२००७१८ जून
२००६३१ मे