छेडछाडीचा जाब विचारला म्हणून भावाला मारहाण

By Admin | Updated: February 9, 2015 05:45 IST2015-02-09T05:45:21+5:302015-02-09T05:45:21+5:30

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावाला ८ ते १० जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी अग्रवाल महाविद्यालयासमोर घडली

Striking a brother as he asked for a tease | छेडछाडीचा जाब विचारला म्हणून भावाला मारहाण

छेडछाडीचा जाब विचारला म्हणून भावाला मारहाण

कल्याण : बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणा-या भावाला ८ ते १० जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी अग्रवाल महाविद्यालयासमोर घडली. यात पीडित महाविद्यालयीन तरुणीलाही मारहाण झाली असून तिच्या मैत्रिणीचाही विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित तरुणी अग्रवाल महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती दुपारी अडीचच्या सुमारास महाविद्यालयाबाहेर उभी असताना एका अनोळखी तरुणाने तिची छेड काढली. त्याकडे तिने दुर्लक्ष केले असता त्याने शिवीगाळ करीत बाजूला पडलेल्या लाकडी काठीने तिला मारहाण केली. या वेळी तिचा भाऊ मदतीसाठी धावून आला असता संबंधित तरुणाने फोन करून त्याच्या ८ ते १० मित्रांना घटनास्थळी बोलवून घेतले आणि छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या भावाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या वेळी झालेल्या झटापटीत पीडित तरुणीबरोबरच तिच्या मैत्रिणीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी एमएफसी पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पसार झालेल्या तरुणांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक विजय भिसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Striking a brother as he asked for a tease