महागावात मोर्चावर पोलिसांचा लाठीमार

By Admin | Updated: June 27, 2016 05:00 IST2016-06-27T05:00:11+5:302016-06-27T05:00:11+5:30

विविध मागण्यांसाठी भाजपाचे आमदार राजेंद्र नजरधने यांच्या महागाव येथील कार्यालयावर रविवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला

Strike the police on a raid in Mahagaon | महागावात मोर्चावर पोलिसांचा लाठीमार

महागावात मोर्चावर पोलिसांचा लाठीमार


महागाव (यवतमाळ) : पीक विम्यासह विविध मागण्यांसाठी भाजपाचे आमदार राजेंद्र नजरधने यांच्या महागाव येथील कार्यालयावर रविवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. तर जमावातून भिरकावलेल्या दगडाने एक जण गंभीर जखमी झाले.
तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर मोर्चा आमदार नजरधने यांच्या कार्यालयावर नाही, तर घरावर नेण्यासाठी काही जण आग्रही होते. त्याचवेळी नजरधने मोर्चाला सामोरे आले. त्यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची भाषणे झाली. मात्र सेनेचा एक गट प्रमोद भरवाडे यांच्या नेतृत्वात घोषणा देत होता. हा मोर्चा आमदाराच्या कार्यालयावर पोहोचल्यावर तेथे गोंधळ सुरू झाला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. मोर्चातील नागरिक सैरावैरा पळू लागले. या वेळी चेंगराचेंगरी होऊन काही जण जखमी झाले. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना पांगविल्यानंतर प्रमोद भरवाडे यांच्यासह काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले.
मोर्चा आमदाराच्या कार्यालयावर ज्या वेळी पोहोचला त्या वेळी जमावातून एक दगड या कार्यालयाच्या दिशेने भिरकावला. त्यात भाजपाचे शहर अध्यक्ष सुरेश नरवाडे जखमी झाले. त्यांना पुसद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)
>सर्व सुरळीत असताना काही समाजकंटकांनी मला टार्गेट करून इतरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. मोर्चाला चेहरा नसतो, अशा वेळी पोलिसांनी काही निर्णय घेतला असेल तो प्रसंग पाहूनच घेतलेला निर्णय आहे.
- राजेंद्र नजरधने, आमदार

Web Title: Strike the police on a raid in Mahagaon