लाचखोर अभियंत्याला अटक
By Admin | Updated: October 31, 2015 02:07 IST2015-10-31T02:07:42+5:302015-10-31T02:07:42+5:30
वीज वितरणच्या ठेकेदाराकडे तीन लाख ९६ हजार रुपयांची मागणी करून ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना वीज वितरण कंपनीचा शिळफाटा येथील कनिष्ठ अभियंता समीर रमेश मानकामेला

लाचखोर अभियंत्याला अटक
खालापूर : वीज वितरणच्या ठेकेदाराकडे तीन लाख ९६ हजार रुपयांची मागणी करून ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना वीज वितरण कंपनीचा शिळफाटा येथील कनिष्ठ अभियंता समीर रमेश मानकामेला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. तीनच दिवसांपूर्वी पंचायत समिती सदस्य निवृत्ती पिंगळे व विस्तार अधिकारी अशोक शेगोकर यांनाही अटक करण्यात आली होती.
समीर मानकामे महावितरणचे ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी तीन लाख ९६ हजार रुपये मागत असल्याची तक्र ार एका ठेकेदाराने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. याबाबत खात्री केल्यानंतर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सापळा रचला होता.