अहमदनगरमध्ये एसटीला अपघात, २१ जखमी
By Admin | Updated: February 19, 2016 11:00 IST2016-02-19T09:41:51+5:302016-02-19T11:00:17+5:30
पुणे-अमहदनगर महामार्गावर शुक्रवारी सकाळी मुंबई-पाटोदा एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाला.

अहमदनगरमध्ये एसटीला अपघात, २१ जखमी
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. १९ - पुणे-अमहदनगर महामार्गावर शुक्रवारी सकाळी मुंबई-पाटोदा एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाला. या दुर्घटनेत एसटीतील २१ प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबईहून पाटोद्याच्या दिशेने येत असलेल्या एसटीबसला अहमनगरच्या केडगाव चौकात समोरुन आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात एसटीच्या एकाबाजूला चक्काचूर झाला. जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ट्रक सोलापूरहून मनमाडच्या दिशेने जात असताना भरधाव वेगात असल्याने ट्रक चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला.