शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरची २५ गाड्यांना धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 06:42 IST

कसारा घाटातील थरार : १४ जण जखमी; सात गाड्यांचे मोठे नुकसान

कसारा : नाशिकहून मुंबईच्या दिशेने सळया घेऊ न येणाऱ्या कंटेनरचे कसारा घाटातच ब्रेक निकामी झाल्याने रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास विचित्र अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने या कंटेनरने घाटातील २० ते २५ गाड्यांना धडक दिली. १५ मिनिटे हा थरार सुरू होता. अखेर, मालवाहू ट्रक आणि गॅसच्या टॅँकरला धडकल्यानंतर हा कंटेनर थांबला. यामध्ये सात गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून विविध गाड्यांमधील १४ प्रवासी जखमी असून पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामुळे बंद पडलेली वाहतूक तीन तासांनंतर सुरू झाली; मात्र दोन्ही मार्ग जॅम झाल्याने पाच तास वाहतूककोंडी कायम होती.

अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम शहापूर, कसारा पोलीस पीक इन्फ्रा टीम महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दखल झाले. त्यांनी जखमींना तत्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अलका मोरे, अविनाश मोरे, पूजा गांगुर्डे, ऋतुजा शेळके (३), स्वरा शेळके (१), राजेंद्र घुगे, भाग्यश्री शेळके, चैताली दराडे हे गंभीर जखमी झाले आहेत. इतर जखमींची नावे समजू शकली नाहीत. अपघातानंतर कसारा घाटात वाहतूक ठप्प झाली होती. तीन तासांनंतर ही कोंडी फोडण्यात कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.बी. महाले आणि राठोड आणि कर्मचाऱ्यांना यश आले. दरम्यान, कसारा घाटातील या भीषण अपघाताची माहिती मिळताच ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी मदतकार्यासाठी दाखल झाले होते. मदतकार्य करताना महामार्गचे काम करणाºया ठेकेदार कंपनीकडे क्रेनसह अन्य यंत्रणा नसल्याने अडथळा येत होता. अखेर, ट्रेलरमध्ये अडकलेल्या चालकांना खासगी यंत्रणा वापरून आपत्ती टीम आणि पोलीस प्रशासनाने बाहेर काढले. घाटातील सर्व गाड्या बाजूला करण्यासाठी उपलब्ध केलेल्या क्रेन जुन्या असल्याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे....तर मोठा अनर्थ झाला असता!ब्रेक फेल झालेल्या ट्रेलरमध्ये सळई होत्या. या ट्रेलरने अखेरीस गॅस टँकरला धडक दिली. यामध्ये गॅस लीक झाला असता तर मोठा अनर्थ ओढावला असता. तसे झाले असते तर हाहाकार उडाला असता, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटून कंटेनरने १० ते १५ गाड्यांना धडक दिली. त्यात वाहनांची अशी स्थिती झाली होती.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात