लोको पायलटवर वाढला कामाचा ताण

By Admin | Updated: June 23, 2014 01:12 IST2014-06-23T01:12:35+5:302014-06-23T01:12:35+5:30

सहा महिन्यांसाठी भुसावळ डिव्हीजनला पाठविलेले लोको पायलट दोन वर्ष होऊनही परतले नाहीत. यामुळे नागपूर विभागात २५० लोको पायलटची पदे रिक्त झाली असून कार्यरत लोको पायलटवर कामाचा ताण वाढला आहे.

Stretching work on loco pilot increased | लोको पायलटवर वाढला कामाचा ताण

लोको पायलटवर वाढला कामाचा ताण

सुरक्षेशी तडजोड : अपघातांना निमंत्रण देतेय रेल्वे प्रशासन
दयानंद पाईकराव - नागपूर
सहा महिन्यांसाठी भुसावळ डिव्हीजनला पाठविलेले लोको पायलट दोन वर्ष होऊनही परतले नाहीत. यामुळे नागपूर विभागात २५० लोको पायलटची पदे रिक्त झाली असून कार्यरत लोको पायलटवर कामाचा ताण वाढला आहे. त्यांना सुट्या मिळणे बंद झाले असून, ओव्हरटाईम करावा लागत आहे. याचा परिणाम सुरक्षेवर होत असून बाहेर पाठविलेले लोको पायलट त्वरित परत बोलावून सुरक्षेशी करण्यात येत असलेली तडजोड बंद करावी, अशी मागणी होत आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील १२७ लोको पायलट जून २०१२ मध्ये ६ महिन्यांच्या कालावधीसाठी भुसावळ विभागात पाठविण्यात आले. परंतु जून २०१४ पर्यंत हे लोको पायलट भुसावळ विभागाने नागपूर विभागाला परत केले नाहीत.
सध्या नागपूर विभागात २५० लोको पायलटची पदे रिक्त झालेली आहेत. यामुळे कार्यरत असलेल्या लोको पायलटवर कामाचा ताण येत आहे. त्यांना सुट्या मिळणे बंद होऊन जास्त वेळ काम करण्याची पाळी आली आहे. लोको पायलटची नोकरी अतिशय जोखमीची आहे. सिग्नलकडे लक्ष ठेवून प्रवाशांना सुखरूप पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी लोको पायलटवर आहे. एखादा सिग्नल ओव्हर शूट झाल्यास त्यांना आपली नोकरी गमावण्याची पाळी येते.
परंतु लोको पायलटची पदेच विभागात रिक्त असल्यामुळे त्यांना ओव्हरटाईम करण्याची पाळी आली असून यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. विभागात गार्डची एकून ५६० मंजूर पदे असून त्यातील ११० पदे रिक्त आहेत. त्यामुळे गार्डला सुट्या मिळत नसून त्यांनाही लोको पायलटप्रमाणे ओव्हरटाईम करावा लागत आहे. त्यामुळे गार्डची आणि लोकोपायलटची रिक्त पदे त्वरित भरून सुरक्षेशी करण्यात येत असलेली तडजोड बंद करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Stretching work on loco pilot increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.