फेसबुकवर विटंबना आलेगावात तणावपूर्ण शांतता
By Admin | Updated: July 29, 2016 19:43 IST2016-07-29T19:43:54+5:302016-07-29T19:43:54+5:30
चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत आलेगाव येथे फेसबुकच्या अकाउंटवर एका महिलेला बुरखा घालून विशिष्ट धर्मियांच्या भावना दुखवल्याची बाब २९ जुलै रोजी उघडसकीस आली

फेसबुकवर विटंबना आलेगावात तणावपूर्ण शांतता
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २९ : चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत आलेगाव येथे फेसबुकच्या अकाउंटवर एका महिलेला बुरखा घालून विशिष्ट धर्मियांच्या भावना दुखवल्याची बाब २९ जुलै रोजी उघडसकीस आली. त्याबाबत ग्रामसिंनी पोलिसांना निवेदन दिले असून तणावपूर्ण शांतता आहे.
आलेगाव येथील मो. शारीक मो. फारूख, मो. तौफिक मो. हैदर, आसीफ मिर्झा हे तिघेजण एकत्र बसले होते. फेसबुक अकाउंट उघडल्यावर ह्यबजरंग दल आलेगावह्ण या नावाच्या अकाउंटवर आक्षेपार्ह फोटो व मजकूर अपलोड केल्याचे आढळले. सदर घटनेची माहिती मिळताच चान्नीचे ठाणेदार वैभव पाटील आपल्या ताफ्यासह आलेगाव येथे शुक्रवारी ४ वाजताच्या सुमारास दाखल झाले असून शांतता ठेवण्योच आवाहन त्यांनी केले. तसेच योग्य कारवाई करण्याचे आश्वासनही दिले.