आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमुळे तणाव, पोलीस ठाण्यावर दगडफेक, जाळपोळ

By Admin | Updated: March 19, 2017 10:59 IST2017-03-19T10:58:17+5:302017-03-19T10:59:44+5:30

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने संतप्त जमावाने मुंबईतील मानखुर्द परिसरात दगडफेक करत पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ केल्याची घटना सकाळी घडली आहे.

Stress due to offensive Facebook post, picketing at police station, fireworks | आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमुळे तणाव, पोलीस ठाण्यावर दगडफेक, जाळपोळ

आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमुळे तणाव, पोलीस ठाण्यावर दगडफेक, जाळपोळ

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने संतप्त जमावाने मुंबईतील मानखुर्द परिसरात दगडफेक करत पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ केल्याची घटना सकाळी घडली आहे. त्यामुळे या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 20 संशयितांना अटक करून त्यांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. तर याप्रकरणी एम आय एम चे नगरसेवक शहानवाज हुसेन यांनाही ताब्यात घेतले आहे.

फेसबुकवर जातीय तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकल्या करण्यावरून ट्रोमबे मध्ये रात्री दंगा झाला.100 ते 150 जांनाचा जमाव ट्रोमबे पोलीस स्टेशनवर चालून आला. जमावानी पोलीस स्टेशनवर दगड फेक केली तसेच पोलिसांची 2 वाहने जाळली. यात 5 ते 7 पोलीस जखमी झाले आहेत. प्रतिउत्तरात पोलिसांनी लाठी चार्ज केला तसेच हवेत गोळीबार केला.

सध्या परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे. फेसबुक वर आक्षेपाहर पोस्ट टाकणाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर आय टी कलमानुसार कारवायी केली आहे.

Web Title: Stress due to offensive Facebook post, picketing at police station, fireworks