शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
6
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
7
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
8
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
9
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
10
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
11
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
12
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
13
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
14
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
15
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
16
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
17
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
18
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
19
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
20
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार

जगण्याचे बळ !

By admin | Updated: August 14, 2016 02:56 IST

गतिमंद म्हणून जन्माला येणे हा ‘त्या’ मुलांचा दोष नसतो आणि पालकांचाही. मात्र अशा मुलांचे समाजात वावरताना सातत्याने मानसिक खच्चीकरण होत असते. तरीदेखील ही मुले जगत असतात.

- सागर नेवरेकरगतिमंद म्हणून जन्माला येणे हा ‘त्या’ मुलांचा दोष नसतो आणि पालकांचाही. मात्र अशा मुलांचे समाजात वावरताना सातत्याने मानसिक खच्चीकरण होत असते. तरीदेखील ही मुले जगत असतात. धडपडत असतात. अशा मुलांंना जगण्याचे बळ देण्याचे काम करणारे अनेक लोक आहेत. मात्र त्यांच्यापेक्षा वेगळी अशी छाप ‘उमंग चाइल्ड ट्रस्ट’ने पाडली आहे. एक पैसाही न घेता गतिमंद मुलांचे आयुष्य खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या उमंगचा प्रवास ‘सलोनी’मुळे सुरू झाला. आणि आजघडीला मैलाचा दगड पार करणारी ही ट्रस्ट तब्बल ५८ गतिमंद मुलांचे आयुष्य सार्थकी लावण्यासाठी काम करते आहे.उमंग चाइल्ड ट्रस्टच्या अध्यक्षा अश्विनी कराडे यांच्या मुलीला सलोनीलाही असाच काहीसा त्रास होता. जन्मावेळी सलोनीच्या मेंदूला काहीशी हानी झाली. त्यामुळे ती चालेल, बोलेल का? असे अनेक प्रश्न साहजिकच तिच्या कुटुंबीयांसह डॉक्टरांना पडले. यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी व्यायाम हा पर्याय सांगितला आणि मग सलोनीवर वेगवेगळ्या थेरपी सुरू करण्यात आल्या. ३ महिन्यांपासून तिच्यावर थेरपी सुरू करण्यात आली. तिला व्यायाम शिकवण्यात येऊ लागले. पाच वर्षांनी सलोनीमध्ये फरक जाणवू लागला. इयत्ता चौथी-पाचवीत असताना तिच्यात बऱ्यापैकी सुधारणा झाली. ती चालू लागली, बोलू लागली. त्यामुळे तिच्या बरोबरच्या मुलांच्या पालकांनी सलोनीची आई अश्विनी यांच्याकडे याबाबत विचारणा केली. यावर अश्विनी यांनी या गोष्टी कथन करतानाच सलोनीसारख्या इतर मुलांचाही विचार केला आणि घरच्या घरी गतिमंद मुलांसाठी सेशन्स घेण्यात सुरुवात केली.सेरेब्रल पाल्सी म्हणजे शारीरिक अपंगत्व, मतिमंद, गतिमंद, लर्निंग डिसेबल, आॅटिझम, डाऊन सिंड्रोम हायपर अ‍ॅक्टिव्हिटी अशा अनेक कारणांमुळे मुलांमध्ये मानसिक, शारीरिक विकलांगता येते. या मुलांना जर वेळीच चांगली ट्रीटमेंट दिली तर ही मुले स्वत: जगू शकतात, ही जाणीव त्यांच्यात निर्माण होते. अशा मुलांची ट्रीटमेंट ही विविध पातळ्यांवर चालते. काऊन्सिलिंग, फिजिओथेरपी, आॅक्युपेशनल थेरपी, स्पीचथेरपी, स्पेशल एज्युकेशन या प्रत्येक ट्रीटमेंटसाठी वेगवेगळे सेंटर असतात. एक ट्रीटमेंट झाली की, दुसऱ्या ट्रीटमेंटसाठी दुसऱ्या ठिकाणी पायपीट करावी लागते. मात्र त्यामुळे पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टी खर्च होतात. यावर उपाय म्हणून मग अश्विनी कराडे यांनी ‘उमंग चाइल्ड ट्रस्ट’ स्थापन केली. आणि यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी एकाच छताखाली आणल्या.समाज व्यवस्था या मुलांकडे एका वेगळ्या नजरेने पाहते. संबंधितांना ही मुले ‘वेडी’ आहेत असे वाटते. मात्र या मुलांमध्येही आयक्यू लेव्हल असते. फक्त त्याचे प्रमाण कमी असते आणि त्यांना त्या लेव्हलनुसार शिकवले जात नाही. या सगळ्याचा विचार ट्रस्टने केला. पण हे शिकवायचे म्हणजे ते आपणालाही यायला हवे याचा विचार करत अश्विनी यांनी ‘डिप्लोमा इन लर्निंग डिसेअ‍ॅबिलिटी’, ‘सर्टिफिकेट कोर्स इन आॅटिझम’ स्पेशल एज्युकेशनचे कोर्स केले. पाहता पाहता हा प्रवास मोठा झाला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांसाठी ट्रस्टने मोफत उपचार देण्यास सुरुवात केली. आता तर गतिमंद मुलांच्या पालकांच्याही समुपदेशनाचे काम ट्रस्टकडून केले जाते आहे.उमंगचा श्रीगणेशा झाला तेव्हा त्यांच्याकडे केवळ पाच ते दहा गतिमंद मुले होती. त्यांना प्रशिक्षण दिले जात होते. आता या मुलांचा आकडा तब्बल ५८ झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे काम करण्यासाठी ट्रस्टला अनुदान मिळत नाही. शिवाय त्यांचे काम भाड्याच्या जागेवर चालते. हा सर्व खर्च ट्रस्टचे सहकारी मिळून करतात. इवल्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. मात्र हे काम सोपे नाही. गतिमंद मुलांचे आयुष्य ‘सोनरी’ करण्यासाठी आजही हा ट्रस्ट झगडतो आहे. सलोनीच्या निमित्ताने हा प्रवास सुरू झाला असला तरी अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे.