नार्कोसाठी पोळ तयार

By Admin | Updated: September 30, 2016 02:10 IST2016-09-30T02:10:34+5:302016-09-30T02:10:34+5:30

वाई हत्याकांडातील सिरियल किलर संतोष पोळ लायडिटेक्टर व नार्को चाचणी करण्यासाठी न्यायालयासमोर तयार झाला़ ‘माझे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी ज्या चाचण्या करणे

Strain for Narco | नार्कोसाठी पोळ तयार

नार्कोसाठी पोळ तयार

वाई (सातारा) : वाई हत्याकांडातील सिरियल किलर संतोष पोळ लायडिटेक्टर व नार्को चाचणी करण्यासाठी न्यायालयासमोर तयार झाला़ ‘माझे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी ज्या चाचण्या करणे गरजेचे आहे, त्या सर्व करण्यास माझी हरकत नाही,’ असे संतोषने गुरुवारी न्यायाधीशांना सांगितले़
सहा खून केल्याचे संतोष पोळने पोलीस तपासात सांगितले. मात्र, त्याने तपास कामात पोलिसांना सहकार्य केले नाही़ त्याने आणखी खून व काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्या असहकार्यामुळेच पोलिसांनी न्यायाधीश आर. के. थोरात यांच्याकडे पोळच्या नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग, पॉलिग्राफ व लायडिटेक्टर चाचणी करण्याची परवानगी मागितली. याबाबत न्यायालयाने संतोष व त्याचे वकील औरंगाबादकर यांच्याकडे विचारणा केली़ संतोषने चाचण्यास तयार असल्याचे सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Strain for Narco