शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचं चित्रीकरण थांबवा, शिवसेनेच्या मागणीवर अमोल कोल्हे म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 14:31 IST

Swarajya Rakshak Sambhaji: मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल

ठळक मुद्देइतिहास लपवता येत नाही, लपवू शकत नाही - अर्जुन खोतकर संभाजी महाराजांचे हाल पाहवू शकत नाही, त्यामुळे हे चित्रीकरण थांबवावे - शिवसेनाकुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही - अमोल कोल्हे

मुंबई - झी मराठीवरीलस्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील चित्रीकरण थांबवावं, संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचे हाल शिवप्रेमी पाहू शकत नाही, याबाबत मुख्यमंत्री आणि झी मराठीला विनंती करणार आहे असं माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले होते. त्यावरुन मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

याबाबत डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, स्वराज्यरक्षक संभाजी मालिका गेली अडीच वर्षे सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल, मालिकेत बदल केल्याबाबत जे वृत्त छापलं ते धादांत खोटं आहे. आवश्यक खबरदारी घेऊन मालिकेचे चित्रीकरण केले आहे. कोणताही भाग वगळावा अन्यथा नाही तो अधिकार निर्मात्याचा नाही तर झी मराठी वाहिनीचा आहे असं स्पष्टीकरण डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलं आहे.

 

काय म्हणाले होते अर्जुन खोतकर?इतिहास लपवता येत नाही, लपवू शकत नाही हे खरं आहे. संभाजी महाराजांचे हाल कोणी केले हे सगळ्यांना माहित आहे, त्यामुळे काही जण यातून खुरापती काढून राज्यातील वातावरण बिघडवू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती, त्यातून काही प्रसंग निर्माण होणार असतील तर त्याची खबरदारी वेळीच घेतली पाहिजे असं अर्जुन खोतकर म्हणाले होते. संभाजी महाराजांचे हाल पाहवू शकत नाही, त्यामुळे हे चित्रीकरण थांबवावे अशी मागणी त्यांनी केली होती. 

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संपवण्यात येणार आहे अशी पोस्ट व्हायरल झाली होती. यामध्ये शरद पवारांच्या दबावामुळे ही मालिका बंद होतेय असं म्हटलं होतं. मात्र याबाबत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. या प्रकरणात शरद पवारांना गोवण्याचा दुर्दैवी आणि अत्यंत हीन दर्जाचा प्रयत्न होतोय, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे असं त्यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेSwarajya Rakshak Sambhajiस्वराज्य रक्षक संभाजीShiv SenaशिवसेनाZee Marathiझी मराठी