माजलगावात मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको
By Admin | Updated: September 27, 2016 17:05 IST2016-09-27T17:05:10+5:302016-09-27T17:05:10+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील मोहरी येथील गोसावी समाजातील अल्पवयीन मुकबधीर मुलीवर बलात्कार करणार्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी

माजलगावात मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 27 - अहमदनगर जिल्ह्यातील मोहरी येथील गोसावी समाजातील अल्पवयीन मुकबधीर मुलीवर बलात्कार करणार्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीसाठी माजलगाव तालुका मराठा समाजाच्या वतीने शहरात मंगळवारी दुपारी 1 वाजता शिवाजी चौक येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे शहरातील वाहतुक खोळंबली होती.
येथील अल्पवयीन मुकबधीर मुलीवर 56 वर्षीय नराधम अशोक सदाशिव वाल्हेकर यांने केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. कोपर्डी सारखी घटना घडल्यानंतर संबध महाराष्ट्रात आंदोलने, मोर्चे होवूनही अद्याप कसल्याच प्रकारचा धाक प्रशासनाचा राहिलेला नाही. हे असे माणुसकीला काळीमा फासणार्या नराधमांना फाशी देण्यात यावी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे.
पिडीत मुलीच्या कुटूंबास मदत करण्यात यावी, या मागण्यासाठी माजलगाव तालुका मराठा समाजाच्या वतीने दि.27 मंगळवारी दुपारी 1 वाजता शिवाजी चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल एक तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे शहरातील वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी नायब तहसिलदार नानासाहेब फोलाने याना मागण्याचे निवेदन देण्यात आले. माजलगाव शहर ठाण्याचे प्रभारी एस.एस.अंधारे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचार्यासह दंगल नियंत्रक पथक तैनात होता.