नाशिकमध्ये मतदारांचा रास्ता रोको : यादीतून सहाशे नावे गायब
By Admin | Updated: February 21, 2017 17:05 IST2017-02-21T13:09:33+5:302017-02-21T17:05:52+5:30
शहरातील म्हसरूळ गावठाण परिसरातील प्रभाग क्रमांक १, २, ३ मधील सुमारे साडेसहाशे मतदारांची नावे गायब झाल्याने नागरिकांमध्ये अद्यापही संताप

नाशिकमध्ये मतदारांचा रास्ता रोको : यादीतून सहाशे नावे गायब
नाशिक : शहरातील म्हसरूळ गावठाण परिसरातील प्रभाग क्रमांक १, २, ३ मधील सुमारे साडेसहाशे मतदारांची नावे गायब झाल्याने नागरिकांमध्ये अद्यापही संताप सुरूच असून सर्व महिला, पुरूषांनी रास्ता रोको केला आहे. काही महिलांनी पंचवटी विभागाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव घातला. दरम्यान काही वृध्द महिला अधिकाऱ्यांच्या वाहनात बसल्या असून जोपर्यंत यादीत नावे येत नाही तोपर्यंत गाडीतून खाली उतरणार नसल्याचाही पवित्रा महिलांनी घेतला आहे. यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असला तरी अद्याप आंदोलकांनी आक्रमक पवित्रा सोडलेला नसल्याने मतदान प्रक्रियेला गालबोट लागण्याची चिन्हे आहेत. सुमारे सहाशेहून अधिक नागरिकांची नावे प्रभागांमधील मतदार याद्यांमध्ये समाविष्ट नसल्याने हे लोक संतप्त झाले आहेत.