वीजदरवाढ प्रश्नी मंत्र्यांची वाहने अडवा

By Admin | Updated: May 3, 2017 03:17 IST2017-05-03T03:17:18+5:302017-05-03T03:17:18+5:30

वीज दरवाढीच्या प्रश्नावर आता निर्णायक आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यापुढे जिल्ह्यात येणाऱ्या मंत्र्यांची वाहने

Stop the ministers' vehicles against the electricity issue | वीजदरवाढ प्रश्नी मंत्र्यांची वाहने अडवा

वीजदरवाढ प्रश्नी मंत्र्यांची वाहने अडवा

 सांगली : वीज दरवाढीच्या प्रश्नावर आता निर्णायक आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यापुढे जिल्ह्यात येणाऱ्या मंत्र्यांची वाहने अडवून घेराव घालण्यात येईल, अशी घोषणी माजी मंत्री, राष्ट्रवादी नेते आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी येथे केली.
शेतीपंपांच्या वीजदरात झालेल्या वाढीच्या निषेधार्थ मंगळवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर दोन्ही कॉँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत बोलताना जयंत पाटील यानी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.
शेतकऱ्यांचा कोणताही प्रश्न मांडला की सरकारच्या पोटात गोळा येतो. त्यांना केवळ उद्योजकांचे प्रश्न सोडवायचे आहेत.
एकीकडे शेतीमालाचे दर कसे पडतील, याची व्यवस्था करायची आणि दुसरीकडे शेतीचा खर्च अधिक वाढवायचा, असा दुहेरी डाव आखून शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनास भाबडा शेतकरी फसला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर तूर लागवड केली.
आता तूर खरेदी आणि आवश्यक भाव यांची जबाबदारी झिडकारली जात आहे. ग्रामीण भागातील उपसा सिंचन प्रकल्प बंद पाडून शेती आणि त्यावर आधारित ग्रामीण अर्थव्यवस्था सरकारला विस्कळीत करायची आहे.
एकीकडे देशातीलउद्योजकांना २ लाख ८० हजार कोटींची सवलत द्यायची आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला ठेंगा दाखवायचा, असे दुटप्पी धोरण सरकार राबवित आहे, असे पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)

टेंभू, ताकारी, म्हैसाळचे बिलही वाढणार

पुढील टप्प्यात टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ पाणीयोजनांचे वीजबिलही वाढणार आहे. त्यामुळे योजनांच्या पट्ट्यातही शेती करणे मुश्कील होणार आहे, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

Web Title: Stop the ministers' vehicles against the electricity issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.